Nana Patole: पटोलेंच्या त्या वक्तव्याने भंडाऱ्यात राजकीय वादंग, गावकरी म्हणाले, मोदी नावाच्या गुंडाचं कधी नावंही ऐकलं नाही

आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडीओने भंडारा जिल्ह्यात राजकीय वादळ निर्माण केले.
Nana Patole: पटोलेंच्या त्या वक्तव्याने भंडाऱ्यात राजकीय वादंग, गावकरी म्हणाले, मोदी नावाच्या गुंडाचं कधी नावंही ऐकलं नाही
Nana Patole Saam Tv

भंडारा: आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडीओने भंडारा जिल्ह्यात राजकीय वादळ निर्माण केले. या राजकीय पण वादळाचे पडसाद संपूर्ण देशभर पहायला मिळत आहे (Nana Patole Statement About PM Modi Issue Bhandara Police Says No One Arrested).

Nana Patole
Nana Patole on BJP : माझ्या बोलण्याचा भाजपने विपर्यास केलाय : नाना पटोले

नेमकं काय घडलं?

16 जानेवारीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची जेवणारे येथे प्रचार सभा होती. त्यादरम्यान, आपण मोदीला मारु शकतो आणि शिवीही देऊ शकतो, अशा वक्तव्याचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर टिकेची एकच झोड उठली. अखेर, नाना पटोले यांनी नमतं घेत स्वतः संबंधित खुलासा केला होता.

दरम्यान, त्यांनी आपण हे संपूर्ण वाक्य मोदी नामक गाव गुंड याला संबोधित केले असून लोकांनी भाजपचा त्याचा विपर्यास केल्याचा आरोप नाना पटोले केला. लोकांनी मला तक्रार केली असल्याने त्यासंदर्भात त्यांना धीर देण्यासाठी मी हे वाक्य बोलले असल्याचा नाना पटोले यांनी खुलासा केला. भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदी नामक गुंडाला अटक केली असून याबाबत बयान घेणे सुरू असल्याचे नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. भाजप मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी विषयाचा, वाक्याचा, अर्थाचा, अनर्थ करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

Nana Patole
Ram Kadam on Nana Patole : नाना पटोले यांची जागा तुरुंगात गजाआड !; राम कदम यांची संतप्त प्रतिक्रिया

कुठल्याच स्थानिक गुंडाला अटक केलेली नाही - भंडारा पोलीस

मात्र, त्यांच्या हा दावा फोल ठरताना दिसत असून मोदी नावाच्या अशा कुठल्याच कुठल्याच स्थानिक गुंडाला अटक केली नसल्याचा भंडारा पोलीस दलातील उपविभागीय अधिकारी अरुण वायकर यांनी याबाबत खुलासा केला आहे. ज्या तक्रारी आल्या आहेत त्याबाबत चौकशी करत असून चौकशीला सुरुवात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट केले आहे.

Nana Patole
नाना पटोले यांना मोदींवरील वक्तव्य भोवण्याची शक्यता; भाजप पटोलेंविरोधात आक्रमक!

'मोदी गुंडाचं नावही ऐकलं नाही'

या संपूर्ण प्रकरणात ज्या गावात हे प्रकरण घडलं त्या गावातून हा व्हिडीओ पुढे आला आहे. त्या गावातील सत्य मात्र वेगळेच काही दिसत आहे. आपल्या गावात मोदी नामक गाव गुंड नसल्याचा खुलासा गावकऱ्यांनी केला असून या गुंडाचं नावही न ऐकल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

एकंदरीत भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडीओने उठलेले वादंग देशभर पेटले असून देशभरातील भाजप कार्यकर्त्यांकडून नानांच्या अटकेची मागणी केली जात आहे. त्यामुळे सध्या तरी नानांची सुटका इतक्या लवकर होईल असे दिसून येत नाही.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.