नाना पटोलेंच्या विधानाचा सरकारवर परिणाम नाही : संजय राऊत

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार भक्कम आहे.
नाना पटोलेंच्या विधानाचा सरकारवर परिणाम नाही : संजय राऊत
नाना पटोलेंच्या विधानाचा सरकारवर परिणाम नाही : संजय राऊतsaam tv

विहंग ठाकूर

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार  भक्कम आहे. नाना  पटोले (Nana patole) यांच्या विधानाचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आपली भूमिका मांडली आहे. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि कॉंग्रेस (Congress) एकत्र विधानसभा निवडणूक लढले होते. त्यामुळे कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार का, असा सवाल विचारण्याचा अधिकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आहे आणि ते विचारु शकतात, असेही यावेळी संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Nana Patole's statement has no effect on government: Sanjay Raut)

गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतरही त्यांनी अनेक सार्वजनिक सभेत स्वबळाचा नारा दिला, याविषयी संजय राऊत यांनी साम' शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडींवरदेखील आपली भूमिका मांडली आहे.

यावेळी त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्रिपद न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचे बोलले जात आहे, यावर, हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांची नाराजी भाजपाच्या नेत्यानी तपासायला हवी आणि त्याचे निराकरण करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नाना पटोलेंच्या विधानाचा सरकारवर परिणाम नाही : संजय राऊत
घरीच रहा, सुरक्षित रहा; आपल्याला काेराेनाची साखळी ताेडायची आहे!

त्याचबरोबर आज प्रशांत किशोर कॉंग्रेस खासदार राहुल गंधी यांची भेट घेत असल्याचे विचारण्यात आले. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, प्रशांत  किशोर  कोणत्या  राजकीय  पक्षाचे  नेते  आहेत, मला  माहित  नाही. ते  सगळ्याच  राजकीय  पक्षांना भेटतात. विरोधी पक्षाच्या आघाडीबाबत  ते ठोस  निर्णय घेऊ  शकतील,  असे  मला वाटत  नाही. यासाठी  सगळ्या  पक्षांनी एकत्र  येणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे यावेळी बोलताना संजय राऊत यांनी संघाबाबतही आपले मत व्यक्त केले. आता मुस्लिम मोहल्य्यातही संघाच्या शाखा सुरू होऊ लागल्या आहेत. परिवर्तन चांगलं आहे. इतक्या वर्षात हिंदू राष्ट्रांची संकल्पना मांडत आलो,मतांसाठी आपण हिंदू मुसलमान मतांची  फाळणी करत  होतो. त्यात अनेक हिंदू मुस्लिमांचे बळी गेले, आता जर परिवर्तन होत असेल आणि देशाच्या अखंडतेला बळ मिळत असेल, तर विचार करायला हवा संघ इतका का बदलतोय. संघाच कार्य  चांगलं  आहे. संघ  बदलत असेल  तर हा  प्रयोग म्हणून पाहायला पाहिजे., असेही यावेळी संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com