रिफायनरीसाठी पुन्हा पडणार संघर्षाची ठिणगी? समर्थक गट स्थापित

रिफायनरीसाठी पुन्हा पडणार संघर्षाची ठिणगी? समर्थक गट स्थापित
Refinery Project

रत्नागिरी :  रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. नाणार परिसरातील रिफायनरीचा nanar refinery विरोध लक्षात घेता कंपनीने बारसू barsu आणि सोलगाव solgaon परिसरात जागेची चाचपणी सुरु केली. इथल्या ग्रामस्थांनीही रिफायनरीला समर्थन दर्शवत जागा देण्याची तयारी देखील दर्शवली. त्यामुळे या परिसरातील रिफायनरी समर्थक गट तयार झाला. (nanar-refinery-project-shivsena-bjp-ratnagiri-news)

दरम्यान या परिसरात रिफायनरी होऊ देणार नाही असाही दूसरा गट तयार झाला आहे. याबराेबरच विरोधासाठी संघर्ष समिती देखील निर्माण झाली. विरोध करण्या-यांबराेबरच रिफायनरी समर्थकांची देखील रिफायनरी समर्थक समिती स्थापन करण्यात आली आहे. नाणार रिफायनरीला शिवसेनेचा विरोध होता. आता रिफायनरीचे समर्थन हे येथील शिवसैनिकच करत आहेत.

राजापूरमधील rajapur शिवसैनिकांनी shivsena भाजपमध्ये bjp प्रवेश केलेला आहे. बारसू - सोलगाव भागात रिफायनरी प्रकल्पासाठी नुकतीच समिती स्थापन करण्यात आली. या समन्वय समितीत पुर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिकांचा समावेश आहे. याबराेबरच समितीच्या अध्यक्षपदावर पुर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक आहेत. यामुळे सेनेच्या गाेटातही पेच निर्माण हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Refinery Project
काेकणवासियांनाे! दक्षिण मांड नदीवरील पूल वाहतुकीस झाला खुला

देवाचे गोठणे - सोलगाव - नाटे दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीची स्थापना झाली आहे. या समितीत 36 जणांचा समावेश आहे. या समितीत पुर्वाश्रमीच्या कडव्या आणि कट्टर शिवसैनिकांचा सहभाग असल्याने आता दाेन गटात (समर्थन आणि विराेधी समिती) यांच्यात आगामी काळात संघर्ष हाेणार असे चिन्ह आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com