नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोग्य शिबिरात 327 जणांचा सहभाग

या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाच्या वेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. मोहम्मदखान पठाण, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी नांदेड आरोग्य शिबीर
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी नांदेड आरोग्य शिबीर

नांदेड : आरोग्यम धनसंपदा या अभियाना अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ता. 24 जुलै रोजी गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 177 रुग्णांनी विविध आजारांची तपासणी करुन घेतली तर 150 नागरिकांनी कोविड लस घेतली. 327 जणांनी या आरोग्य शिबिरात सहभाग नोंदविला. या शिबिरास रुग्णांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. Nanded-327- people -participated- in -the- health -camp -of -NCP

या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाच्या वेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. मोहम्मदखान पठाण, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, जिल्हा सरचिटणीस प्रा. डी. बी.जांभरुनकर, जिल्हा उपाध्यक्ष गजानन पांपटवार, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब भोसीकर, जिल्हा संघटक रमेश गांजापुरकर, योगेश पाटील टाकळीकर, बालासाहेब मादसवाड, सुनंदा पाटील जोगदंड, मधुकरराव पिंपळगावकर, सुभाष रावणगावकर, श्रीकांत मांजरमकर, अजिंक्य गांजापुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा - राज्यातून अंधश्रद्धेचा बाजार उठणार तरी कधी?...

यावेळी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर, डॉ. साखरे, डॉ. कुलदिप, डॉ. इंगळे, डॉ. रहेमान, तजमुल पटेल, डॉ. उमेश मुंडे, मिना पेठवडजकर, वर्षा घुंडरे, शोभा गडमवाड, सय्यद सुलताना बेगम, किरोळे योगीता, लोहा तालुका अध्यक्ष पुनम क्षिरसागर, लक्ष्मण क्षिरसागर, चंपत हतागळे, भोकर तालुका अध्यक्षा यशोदा शेळके आदींची उपस्थिती होती. या शिबिरात विविध आजारांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून आला. डॉक्टरांच्या टीमचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदेड जिल्हा महिला अध्यक्ष प्रांजली रावणगावकर यांनी आभार मानले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com