Nanded News: ते घर शेवटचं ठरलं; विजेच्या तारांवर कोसळून २ तरुणांचा जागीच मृत्यू

घराचे बांधकाम करताना तोल जाऊन विजेच्या तारेवर पडल्याने विजेच्या धक्क्याने मिस्त्रीकाम करणाऱ्या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Nanded News:
Nanded News:Saam TV

Nanded Accident News: मृत्यू कधी आणि कसा ओढावेल याची कोणालाच काही कल्पना नसते. अनेकदा शुल्लक चुकांमुळे देखील मोठमोठे अपघात घडतात. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. नांदेडमध्ये अपघाताची अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यात दोन तरुणांचा मृत्यू झालाय. (Latest Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, घराचे बांधकाम करताना तोल जाऊन विजेच्या तारेवर पडल्याने विजेच्या धक्क्याने मिस्त्रीकाम करणाऱ्या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुदखेड तालुक्यातील चिलपिपंरी या गावात गुरुवारी ही दुर्देवी घटना घडलीय. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nanded News:
Beed Crime News: बीडमध्ये चाललंय काय ? भाजप कार्यकर्त्यांची दादागिरी; सीईओ अजित पवार यांना शिवीगाळ

चिलपिपंरी गावात घरकुलाचे बांधकाम सुरू होते. याच गावातील पुंजाजी गाडे आणि संभाजी गाडे हे दोन तरुण घरकुलाचे बांधकाम करत असताना त्यांचा तोल गेला. तोल जाऊन ते बाजूला असलेल्या विजेच्या तारेवर पडले. विजेचा धक्का लागल्याने या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.

भरधाव ट्रकने चौफाळा येथील दोन तरुणांना चिरडले

भोकर येथे लग्न (Wedding) आटोपून नांदेडकडे (Nanded) परतत असताना भोकर -नांदेड मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.नांदेड शहरातील येथील चौफाळा भागातील पंचशील नगरातील हे दोन तरुण आहेत. संदीप काळे आणि राहुल कोलते असे या तरुणांची नावे आहेत.

Nanded News:
Hyderabad Crime News: निकालानंतर ६ विद्यार्थ्यांची आत्महत्या; हृदयद्रावक घटनेनं हैदराबाद हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com