Nanded Accident: मन सुन्न करणारी घटना! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले, २ तरुणांचा जागीच मृत्यू; लग्नाहून परतताना...

Nanded Accident News: ही धडक इतकी जबरदस्त होती की बुलेट फरफटत गेली, ज्यामध्ये दोनही तरुणांना आपला जीव गमवावा लागला..
Nanded Accident
Nanded AccidentSaamtv

संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी...

Nanded News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघातांची मालिकाच सुरू आहे. ज्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नुकतीच नांदेडमधून एका दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. भोकर येथ लग्न आटोपून घराकडे परतताना भोकर - नांदेड मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nanded Accident
Saamana Editorial: फुटीर गटाचे अंतर्वस्त्रही सर्वोच्च न्यायालयाने उतरवले; 'सामना'तून जोरदार टीका

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, गुरूवार (११, मे) नांदेड (Nanded) शहरातील चौपाळा भागातील पंचशील नगर येथील संदीप गौतम काळे आणि राहुल बाबुराव कोलते हे दोघेजण आपली बुलेट क्रमांक एम एच 26 बी झेड 2036 वरून आज लग्नासाठी भोकर येथे गेले होते. यावेळी लग्न आटोपून दोघेही त्यांच्या घराकडे जात होते. (Latest Marathi News)

सहा वाजता पेट्रोल पंपा नजीक कन्हैया स्वीट मार्टच्या समोर (RJ14 GP 4757) क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या बुलेटला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की बुलेट फरफटत गेली. त्यामुळे दोन्ही तरुण ट्रकच्या चाकाखाली आले. या धक्कादायक घटनेत दोन्ही तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. (Accident News)

Nanded Accident
Parabhani News: हदयद्रावक! सेफ्टी टँक साफ करताना घडला अनर्थ, एकाच घरातील ५ जणांचा मृत्यू; मन सुन्न करणाऱ्या घटनेने हळहळ

या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com