नांदेड : चोरी प्रकरणातील आरोपीला शिक्षा; १४ वर्षापासून होता पसार

पाहिजे व फरारी असलेला आरोपी नामे शिवाजी भानुदास शितोळे (वय ४०) वर्ष राहणार नाथनगर आर्णी, जिल्हा यवतमाळ हा चौदा वर्षांपूर्वी ठाण्याच्या लॉकअपमधून पळून गेला होता.
नांदेड : चोरी प्रकरणातील आरोपीला शिक्षा; १४ वर्षापासून होता पसार
हाच तो आरोपी १४ वर्षापासून फरार होता.

साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) : माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलिस ठाण्यामध्ये वाहन चोरी प्रकरणातील गुन्हा नोंद असलेला आरोपी चौदा वर्षांपूर्वी पोलिस लॉकअपमधून फरार झाला होता. आरोपीला फरारी घोषित करुन प्रकरण नस्ती बद्ध करण्यात आले होते.

सिंदखेड पोलिस ठाण्याला नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षककांनी जुने प्रकरणाचा निपटारा करण्याची प्रक्रिया सुरु केल्याने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे लपून वास्तव्य करत असलेल्या आरोपीला पकडण्यात सिंदखेड पोलिसांना यश आले असून मंगळवार (ता. १३) रोजी माहूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पंधरा दिवसाची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा - वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल चोरीच्या घटनांवर आळा घालून आरोपींना अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

पोलिस ठाणे सिंदखेड येथील गु.र.न.०५/२००८ कलम २२४ भादविमधील पाहिजे व फरारी असलेला आरोपी नामे शिवाजी भानुदास शितोळे (वय ४०) वर्ष राहणार नाथनगर आर्णी, जिल्हा यवतमाळ हा चौदा वर्षांपूर्वी ठाण्याच्या लॉकअपमधून पळून गेला होता. तो आर्णी येथे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन आज सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके व सोबत पोलिस नाईक कुमरे, हवालदार श्री. पठाण, श्री. सानप, श्री. मोकले, गजानन नंदगावे यांच्यासह आर्णी येथे जाऊन सदर आरोपीस सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर न्यायालय माहूर यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीस पंधरा दिवसाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सदर आरोपीस आवश्यक बंदोबस्तात जिल्हा कारागृह नांदेड येथे रवाना करण्यात आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com