भक्तानेच केला भोंदुबाबाचा भांडाफोड: लाखो रुपये उकळणारा भोंदूबाबा जेरबंद

भगवान दत्ताचा अवतार असल्याचे सांगून अनेकांना गंडा घालत असलेल्या भोंदू बाबाला माहूर पोलिसांनी रात्री अटक करण्यात आली
भक्तानेच केला भोंदुबाबाचा भांडाफोड: लाखो रुपये उकळणारा भोंदूबाबा जेरबंद
भक्तानेच केला भोंदुबाबाचा भांडाफोड: लाखो रुपये उकळणारा भोंदूबाबा जेरबंद संतोष जोशी

नांदेड : भगवान दत्ताचा अवतार असल्याचे सांगून अनेकांना गंडा घालत असलेल्या भोंदू बाबाला माहूर पोलिसांनी रात्री अटक करण्यात आली आहे. विश्वजीत कपिले असे या भोंदू बाबांचे नाव असून, त्याने मुंबई आणि पुण्यातील अनेकांना गंडा घातला आहे. हा भोंदू बाबा स्वतःची देवाप्रमाणे पूजा अर्चना आपल्या भोळ्या भक्तांकडून करवून घेत असत, याच्या या काळ्या उद्योगाचे शूटिंग भक्तांनीच पोलिसांना उपलब्ध करून दिले आहे. असाध्य आजार बरे करुन, देण्याचा दावा हा भोंदूबाबा करत असत, तसेच नोकरी लावून देणे, कौटुंबिक वादविवाद दूर करून देण्याचा दावाही हा बाबा करत होता.

हे देखील पहा-

यासाठी अघोरी पूजा करायला तो भक्तांना सांगत असत, त्यासाठी भाविकांकडून लाखो रुपये देखील महाराजाने उकळवले आहेत. मांडूळ, कासवाची पूजा करण्याच्या नावाखाली तो फसवणूक करत होता. या प्रकरणी डोंबिवली येथील प्रवीण शेरकर यांच्या तक्रारीवरून माहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकट्या शेरकर यांच्याकडून या भोंदू बाबाने २४ लाख रुपये उकळल्याची तक्रार आहे. या भोंदू बाबाने चक्क दत्त शिखर देवस्थानावर आपला बाजारच मांडून ठेवला होता. मात्र, त्याची भोंदूगिरी लक्षात येताच देवस्थानने त्याला हाकलून दिले होते. आता रात्री या बाबाला अटक करण्यात आले आहे.

भक्तानेच केला भोंदुबाबाचा भांडाफोड: लाखो रुपये उकळणारा भोंदूबाबा जेरबंद
झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी शेतकऱ्यांसह "आमदारांची" औसा ते तुळजापूर पदयात्रा...

आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या खळबळजनक प्रकाराने नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. याअगोदर, २ मुली झाले आणि सासू-सासऱ्यांनी लग्नात योग्य मानपान केला नाही. याचा राग मनात धरुन पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. मुलगा होण्याकरिता कामशेत मधील भोंदूबाबासमोर बसवून महिलेला अंगारा खायला लावल्याचाही आरोप करण्यात आला होता. तर घरी नेऊन नग्नावस्थेत महिलेच्या शरीरभर अंगारा फासल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.