नांदेड : दुसरीशी घरोबा करणाऱ्या पतीसह सात जणांवर गुन्हा

पोलिसांच्या माहितीनुसार, यातील २५ वर्षीय विवाहिता हीचे लग्न लोहारा, ता. उदगीर जि. लातूर येथील महादेव शेषेराव सूर्यवंशी याच्याशी रितिरिवाजाप्रमाणे करुन देण्यात आला होता.
नांदेड : दुसरीशी घरोबा करणाऱ्या पतीसह सात जणांवर गुन्हा
मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सद्दाम दावणगीरकर

मरखेल (जिल्हा नांदेड) : पहिली पत्नी हयात असताना तिला माहेरहून ८० हजार रुपये घेऊन ये म्हणून मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ करुन, दुसरीशी घरोबा करणाऱ्या पतीसह सासरच्या सात लोकांवर मरखेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हा प्रकार ता. १४ मार्च २०२१ पासून विवाहितेच्या सासरी लोहारा व मरखेल येथे सुरु होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, यातील २५ वर्षीय विवाहिता हीचे लग्न लोहारा, ता. उदगीर जि. लातूर येथील महादेव शेषेराव सूर्यवंशी याच्याशी रितिरिवाजाप्रमाणे करुन देण्यात आला होता. लग्नानंतर पती महादेव शेषेराव सूर्यवंशी, सासरा शेषेराव सूर्यवंशी, सासू मंगलबाई शेषेराव सूर्यवंशी, दीर बंडू शेषेराव सूर्यवंशी सर्व रा. लोहारा व ननंद संगीता गंगाराम रा. चोंडी ता. उदगीर, मामा राजू पंढरी कांबळे रा. टाकळी ता. उदगीर, सविता महादेव सूर्यवंशी रा. लोहारा या सर्वांनी संगनमत करुन तुला मुलबाळ होत नाही, तू काळी आहेस, मोटारसायकल घेण्यासाठी माहेरकडून ८० हजार रुपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ करुन मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जलाशयात एकूण ८३ टक्के जलसाठा झाला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे प्रकल्पात पाण्याचा येवा वाढत असल्याने धरणाचे चौदा दरवाजे उघडण्यात आले.

शिवाय पहिली पत्नी हयात असताना या सासरच्या लोकांनी महादेव याचे सविता हिच्याशी दुसरे लग्न लावून दिले. हा प्रकार लक्षात आल्यावर या विवाहितेने महिला तक्रार निवारण कक्षात मदत मागितली. मात्र याउपरही काहीच होत नसल्याने मरखेल ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी उपरोक्त सात लोकांवर मरखेल ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास जमादार प्रभाकर गुडमलवार हे करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com