नांदेड : काँग्रेसच्या बैलगाडी मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल

राज्यात पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेलाच्या भाव वाढी विरोधात नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
नांदेड : काँग्रेसच्या बैलगाडी मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल
काॅंग्रेसच्या बैलगाडी मोर्चावर गुन्हा दाखल

नांदेड : महागाई विरोधात काँग्रेस पक्षांनी नांदेड येथे भव्य बैलगाडी मोर्चा काढला होता. या मोर्चात कोरोना नियमाचे कुठलेही पालन केले गेले नाही. अशी तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली होती. त्यावरुन शुक्रवारी (ता. १६) काँग्रेस आयोजित बैलगाडी मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.Nanded- case -has- been -registered- against- the organizers- Congress- Bullock- Cart -Morcha

राज्यात पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेलाच्या भाव वाढी विरोधात नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड शहरातील नवा मोंढा भागातून या मोर्चाला सुरुवात झाली व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याचा समारोप करण्यात आला होता. या मोर्चात हजारोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले होते. त्यामुळे कोरोना रोगाच्या नियमांचे पालन केले गेले नाही. अशी तक्रार वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद आणि जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात दिली होती. एकीकडे न्याय हक्काच्या मागणीसाठी नियमांचे पालन करुन आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, मात्र प्रस्थापित पक्षांच्या हजारोच्या मोर्चावर प्रशासन कुठलाही बडगा उगारायल तयार नाही. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांना एक न्याय आणि प्रस्थापित कार्यकर्त्यांना दुसरा न्याय अशी दुटप्पी भूमिका पोलिस प्रशासन घेत असल्याची कैफियत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मांडण्यात आली होती.

हेही वाचा - सहा महिन्यापासून जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे प्रशासकीय स्तरावर आवश्यक असलेली मंजुरी व प्रक्रीया युध्दपातळीवर पूर्ण करण्यात आली.

राज्य प्रवक्ते फारुक अहमद व जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांच्या नेतृत्वात नांदेड येथील वजिराबाद पोलिस ठाण्यात याबाबत रितसर तक्रार देण्यात आली होती. यादरम्यान पोलिस प्रशासन फिर्याद नोंदवून घेत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी जर पोलिस प्रशासन गुन्हा दाखल करणार नसेल तर याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर वजिराबाद पोलिस ठाणे येथे या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com