
नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाळूचे टिप्पर सुरू ठेवण्यासाठी 10 हजारांची लाच (Bribe) घेताना स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदाराला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (LCB) पथकाने सोमवारी (13 जून) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही कारवाई केली. (Nanded Latest Crime News)
भानुदास वडजे असं लाच स्वीकारताना अटक केलेल्या सहाय्यक फौजदाराचं नाव आहे. वडजे यांनी तक्रारदाराकडून वाळूचे दोन टिप्पर चालू देण्यासाठी 12 हजाराची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडी अंती त्यांनी 10 हजार रुपये तक्रारदाराला मागितले. दरम्यान, तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी याची माहिती लाचलुचपत पथकाला दिली.
दरम्यान, तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत पथकाने तात्काळ सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने वडजे यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलावलं. त्यानंतर लाचलुचपत पथकाने वडजे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं. त्यांची झाडझडती घेतली असता वडजे यांच्याकडे 38 हजार आणि कारमध्ये 94 हजार रुपये सापडले. दरम्यान या कारवाई चा व्हिडीओ सोशल मीडीयावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत, मी लाच स्वीकारली नाही म्हणून वडजे हे लाचलुचपत पथकासोबत वाद घालताना दिसून येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदारच लाचेच्या जाळ्यात अडकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाळूसाठी लाच स्वीकारताना आठ दिवसात दुसरा पोलिस कर्मचारी अडकल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.