Nanded Crime News : दोन दुचाकीवर 6 जण आले, कार अडवून बंदूकीचा धाक दाखवला, 10 लाखांची बॅग घेऊन पसार झाले

Oil Dealer Robbed in Nanded: खाद्यतेलाचे पैसे वसूल करून परत येत असताना ही घटना घडली आहे. या प्रकरणी कुंटुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Nanded Crime Car Driver Robbed
Nanded Crime Car Driver Robbedsaam tv

Car Driver Robbed in Nanded: नांदेडमध्ये दुचाकीवरून आलेल्या 6 जणांनी कार चालकाला बंदूकीचा धाक दाखवत कार अडवून 10 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे. खाद्यतेलाचे पैसे वसूल करून परत येत असताना ही घटना घडली आहे. या प्रकरणी कुंटुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे ही घटना घडली आहे. या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या 6 जणांनी कार अडवली आणि बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख रूपये लुटले. मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Nanded Crime Car Driver Robbed
Sitamarhi Lover Stabs Girl: प्रेम प्रकरणातून आणखी एक भयंकर घटना! प्रेयसीला चाकूने 12 वेळा भोसकलं

नांदेड येथील खाद्यतेलाचे व्यापारी रत्नाकर पारसेवार यांनी वितरीत केलेल्या खाद्यतेलाचे पैसे वसुलीसाठी त्यांचा मुनिम आणि चालकाला पाठवले होते. मुनिम युवराज निवळे आणि चालक अंकुश खुजडे यांनी शंकरनगर, नर्सी , मुखेड येथे जाऊन खाद्यतेलाची वसुली केली. यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते दोघेही कारमधून नांदेडकडे परत निघाले.

परंतु नायगाव जवळून जात असताना पाठीमागून दोन दुचाकीवरुन 6 जण आले. त्यांनी यांची कार आडवली आणि वाद घालायला सुरुवात केली. तेवढात त्यातील काहींनी त्याच्याकडे असलेल्या काठ्यांनी कारच्या काचा फोडल्या आणि बंदूकीचा धाक दाखवत दमदाटी केली आणि कारमधील 10 लाख रुपये रक्कम असलेली बॅग घेऊन पसार झाले. (Crime News)

Nanded Crime Car Driver Robbed
Pune Fraud News: धक्कादायक! साखर निर्यात करण्याच्या बहाण्याने फसवणूक; व्यावसायिकाला घातला १.५ कोटींचा गंडा

या घटनेमुळे नायगाव परिसरात खळबळ उडाली आहे. याविषयी माहिती मिळताच नायगाव आणि कुंटूर पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र चोरटे तोपर्यंत पसार झाले होते. या प्रकरणी कुंटुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com