नांदेडमध्ये १९ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या; ५ दिवसांपासून होता बेपत्ता

Nanded Murder : चंद्रकांत हा २९ एप्रिल रोजी घरातून किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, यानंतर तो घरी परतलाच नाही.
नांदेडमध्ये १९ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या; ५ दिवसांपासून होता बेपत्ता
Nanded MurderSaam Tv

नांदेड : नांदेड जिल्ह्यात (Nanded) एका १९ वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून (Murder) करण्यात आला आहे. मुदखेड (Mudkhed) तालुक्यातील अमदुरा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रकांत शंकर पवार (Chandrakant Pawar) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चंद्रकांत हा २९ एप्रिल रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, आज सकाळी गावातील झुडपात त्याचा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत हा २९ एप्रिल रोजी घरातून किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, यानंतर तो घरी परतलाच नाही. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने चंद्रकांत कुटुंबियांनी नातेवाईक तसे मित्रमंडळीकडे त्याचा शोध घेतला. मात्र तो तिथेही आला नसल्याचं त्यांना कळालं. अखेर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत चंद्रकांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यापासून पोलीस चंद्रकांतचा शोध घेत होते.

दरम्यान, तब्बल पाच दिवसांनी मंगळवारी (३ मे) चंद्रकांतचा मृतदेह गावातील झुडूपात आढळून आला. एका अज्ञात व्यक्तीने चंद्रकांतचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केला. याप्रकरणी चंद्रकांतचे वडील शंकर पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुदखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, चंद्रकातच्या हत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.