स्वस्तातल्या सोन्याच्या बिस्कीटाला महिला भुलली; भामट्याने असा घातला 99 हजारांचा गंडा

स्वस्तात सोने खरेदी करण्याच्या नांदात अनेकांना भुर्दंड बसतो.
स्वस्तातल्या सोन्याच्या बिस्कीटाला महिला भुलली; भामट्याने असा घातला 99 हजारांचा गंडा
Nanded Crime NewsSaam Tv

नांदेड : सोने खरेदी करण्याचा अनेकांना मोह असतो. आपल्याकडे जास्तीत जास्त सोने (Gold) असावे असं महिलांना नेहमी वाटतं. मात्र, सोने खरेदी करताना अनेकांची फसवणूक होते. स्वस्तात सोने खरेदी करण्याच्या नांदात अनेकांना भुर्दंड बसतो. असाच काहीसा प्रकार नांदेड (Nanded) जिल्ह्यातील महिलेसोबत घडला आहे. मी धन पायाळू आहे, मला जमिनीतून भरपूर सोने मिळाले आहे, तुम्हाला अर्ध्या किंमतीत सोने देतो, असे म्हणत एका भामट्याने महिलेला तब्बल 99 हजारांचा गंडा घातला आहे. (Nanded Crime News)

Nanded Crime News
दुर्देवी घटना! बारावीच्या परीक्षेत पास झालेला निखील आयुष्याच्या परीक्षेत मात्र हरला

सदरील घटना कंधार तालुक्यातील चिखली येथे घडली आहे. प्रेमा पवळे असं फसवणुक झालेल्या महिलेचं नाव आहे. प्रेमाची परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील करण ऊर्फ हनुमंत कांबळे याच्याशी ओळख झाली. कांबळे याने मला मिळालेले भरपूर सोने थेट बाजारात विकता येत नाही, म्हणून अर्ध्या किंमतीत सोने विकायचे आहे. असा लोभ प्रेमा यांना दाखवला. प्रेमा सुद्धा स्वस्तात मिळणाऱ्या सोन्याला भुलली.

त्यानुसार, तिने सोने खरेदी करण्यासाठी काही पैसे नगद आणि काही पैसे फोन पे द्वारे, असे 99 हजार रुपये कांबळेला दिले. तसेच पैशाच्या मोबदल्यात प्रेमा हिने त्याच्या जवळील पाच तोळ्याचे सोन्याचे बिस्किट खरेदी केले. काही दिवसानंतर तपासणी केली असता, हे सोने बनावट असल्याचे प्रेमाला कळले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, प्रेमा पवळे हिने पोलिसांत धाव घेतली. प्रेमा हिच्या तक्रारीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस हनुमंत कांबळे या भामट्याचा शोध घेत आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com