नांदेड अंमली पदार्थ कारखाना छापा प्रकरण; आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
नांदेड अंमली पदार्थ कारखाना छापा प्रकरण; आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी संतोष जोशी

नांदेड अंमली पदार्थ कारखाना छापा प्रकरण; आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

एनसीबीची आठ दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई

संतोष जोशी

नांदेड - मुंबई एनसीबीचे समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर शिंदे यांच्या पथकाने काल अंमली पदार्थाचा कारखान्याचा पर्दाफाश करुन तीन आरोपींना अटक केली होती. या तिन्ही आरोपींना नांदेडच्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आणखी एका आरोपीला एनसीबीच्या पथकाने अटक केली आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे आता या प्रकरणात आरोपींची संख्या चार झाली आहे. एनसीबीचे पथक आणखी नांदेडमध्येच असून, एनसीबीची आठ दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने वानखेडे यांची टीम अ‍ॅक्शन मोड मध्ये दिसत आहे. या कारखान्यातून तब्बल 111 किलो अंमली पदार्थ, मशिनरी असे एकूण एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेड अंमली पदार्थ कारखाना छापा प्रकरण; आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक; कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी

नांदेड हे कर्नाटक, तेलंगणा राज्याच्या सिमेवर असल्याने अंमली पदार्थांच्या तस्करी हे मोठे केंद्र बनले की काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याप्रकणी आणखी काही ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नांदेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येतात तरी कुठून याचा शोध एनसीबीचे पथक घेत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com