नांदेड : परिक्षेत्रात वाहन तपासणी मोहिमेअंतर्गत 31 लाखाचा दंड वसूल- निसार तांबोळी

परिक्षेत्रातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वाहन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. यात एकूण 22 हजार 113 वाहनांची तपासणी करुन त्यापैकी नऊ हजार ९१ वाहनावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
नांदेड : परिक्षेत्रात वाहन तपासणी मोहिमेअंतर्गत 31 लाखाचा दंड वसूल- निसार तांबोळी
नांदेड रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी

नांदेड : नांदेड परिक्षेत्रातील वाहन चोरीच्या गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सर्व पोलिस अधीक्षक यांची बैठक घेऊन नऊ जुलैपासून विशेष मोहीम सुरु केली आहे. ता. नऊ जुलै रोजी अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 370 गुन्ह्यामध्ये 485 आरोपींविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून 36 लाख 53 हजार 44 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

त्यानंतर ता. दहा जुलै रोजी परिक्षेत्रातील 125 पोलिस अधिकारी व 497 पोलिस अंमलदार यांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ऑल आॅऊट आॅपरेशन राबवून 881 आरोपीतांची घर झडती घेऊन त्यांचा शोध घेतला. 283 आरोपीवर प्रतिबंधात्मक व आर्म अॅक्टनुसार कारवाई करुन अग्नी शास्त्र व तलवारीसह इत्यादी शस्त्रे जप्त करण्यात आली.

हेही वाचा - स्वतःला चार मुलं असलेले खासदार लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार - आव्हाडांचा टोला

ता. 12 जुलै व 13 जुलै रोजी परिक्षेत्रातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वाहन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. यात एकूण 22 हजार 113 वाहनांची तपासणी करुन त्यापैकी नऊ हजार ९१ वाहनावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यातील 41 वाहने प्रकरणे आरटीओकडे कारवाई करण्यासाठी पाठविण्यात आली असून चार वाहने चोरीची आढळली आहे. असा एकूण 31 लाख 12 हजार आठशे 99 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, लातूरचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, परभणीचे पोलिस अधीक्षक जयंत मीना, हिंगोलीचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राबविली आहे. यापुढेही अवैध धंदे गुन्हेगारावर वचक व वाहनचोरीवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरुच राहणार असल्याचे श्री. तांबोळी यांनी सांगितले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com