नांदेड : विष्णुपूरीचे चार दरवाजे उघडले, गोदाकाठच्या गावांना इशारा

प्रशासकीय स्तरावरुन नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आली आहे. पूर नियंत्रण अधिकारी, शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जन यांनी कळविले आहे.
नांदेड : विष्णुपूरीचे चार दरवाजे उघडले, गोदाकाठच्या गावांना इशारा
विष्णुपूरी प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले

नांदेड : विष्णुपूरी धरणाच्या वरील बाजूस जोरदार पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा आवक वाढला आहे. त्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पात पाणी साठा वाढला असल्याने पांटबंधारे विभागाने चार दरवाजे उघडले आहेत. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा - मराठवाड्याच्या वाट्याला केवळ इतिहासाचे विविध संदर्भ वाट्याला आले असे नाही तर भौगोलिक दृष्ट्याही हा प्रांत विविध आव्हानांचा साक्षीदार राहिलेला आहे.

धरणाची पाणी पातळी ही ३५४. ९५ मीटर असून सध्या साठा ८०.०२ तर ९९. ०४ टक्के आहे. पाण्याचा विसर्ग-११६८ क्युमेक्स होत आहे.

धरणाचे सहा, सात, १३ आणि १४ गेट उघडण्यात आले आहेत. तरी विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरुन नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आली आहे. पूर नियंत्रण अधिकारी, शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जन यांनी कळविले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com