नांदेड : जबरी चोरीतील अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

नगदी ५६ हजार ७२७ आणि आठ हजाराचा टॅब असा ६४ हजार ७२७ रुपयांचा ऐवज जबरीने चोरुन नेला होता. याप्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता.
नांदेड : जबरी चोरीतील अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
इतवारा क्राईम न्यूज

नांदेड : इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विणकर कॉलनी परिसरात एकावर गोळीबार करुन त्याच्याकडील ६५ हजार रुपयाचा ऐवज लंपास करणारा अट्टल गुन्हेगारासह दोघांना अटक केली. ही कारवाई इतवारा पोलिसांनी शुक्रवारी (ता. १६) शहराच्या गाडेगाव परिसरात केली. Nanded- criminals- caught- by- police-crime -news

इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ता. १५ जून रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास विणकर कॉलनी येथे महिला बचत गटाची रक्कम जमा करुन कार्यालयाकडे जात असताना मदिनानगर येथे फिर्यादीस दोन अनोळखी व्यक्तीने एका दुचाकीवर येऊन अडविले. त्याच्या दिशेने हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण केली. व त्याच्या जवळील नगदी ५६ हजार ७२७ आणि आठ हजाराचा टॅब असा ६४ हजार ७२७ रुपयांचा ऐवज जबरीने चोरुन नेला होता. याप्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा - विठ्ठल - रुक्‍मिणीच्या महापूजेचा मान वर्ध्यातील दाम्पत्यास

या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे करत होते. या गुन्ह्याच्या तपासात पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा घडला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन सखोल तपास सुरु झाला. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सय्यद अकबर उर्फ शेरु सय्यद गफार राहणार इस्लामपूरा, नांदेड हा व त्याचा एक साथीदार असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी गुन्हे शोध पथकामार्फत आरोपींचा सतत शोध व तपास सुरु ठेवला.

गोळीबार प्रकरणात पाहिजे असलेला आरोपी सय्यद अकबर उर्फ शेरु सय्यद गफार राहणार इस्लामपुरा नांदेड व त्याचा एक साथीदार सय्यद हजम सय्यद लाल रा. इस्लामपुरा या दोघांना शुक्रवारी (ता. १६) जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन नांदेड शहरालगत असलेल्या गाडेगाव रोडवर शिताफीने ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींतावर यापूर्वी इतवारा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

येथे क्लिक करा - वैद्यनाथचे कोणतेही बँक खाते जप्त झाले नाही; कार्यकारी संचालकांचे स्पष्टीकरण

विशेष म्हणजे हे आरोपीतांना कोरोना संसर्ग काळात पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील एका खुनाच्या गुन्ह्यातून पॅरोल रजेवर कारागृहातून सोडण्यात आले होते. या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. जाधव, गुन्हे शोध पथकाचे फौजदार गणेश घोडके, हवालदार श्री. वाकडे, श्री. जाधव, शेख चाऊस, श्री. कोमलवार, शेख सत्तार, शेख खाजा आणि समीर अहमद यांनी परिश्रम घेतले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com