नांदेड : सात मंडळात अतिवृष्टी; सरासरी ४१ मिलीमीटर: कुंडलवाडीत ११३ मिलीमीटर पाऊस

जिल्ह्यात दीर्घ उघडीपीनंतर मागील चार दिवसापासून पावसाने सुरवात केली. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात होत आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ३१ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती.
नांदेड जिल्ह्यात सात मंडळात अतीवृष्टी
नांदेड जिल्ह्यात सात मंडळात अतीवृष्टी

कृष्णा जोमेगांवकर

नांदेड : जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पावसाने मुक्काम केला आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसानंतर सोमवारी काहीसा मंदावलेला पाऊस मंगळवारी (ता. १३) रात्रभर झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बुधवारी सकाळी साडेदहा पर्यंत जिल्ह्यात सरासरी ४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात दीर्घ उघडीपीनंतर मागील चार दिवसापासून पावसाने सुरवात केली. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात होत आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ३१ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे नदीकाढच्या भागात तसेच सखल भागात पाणी साचून शेतपिकांचे नुकसान झाले. याबाबत शासकीय यंत्रणेकडून सर्व्हेचे काम सुरु आहे. अशातच मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. हा पाऊस बिलोली, कंधार, लोहा, उमरी, नायगाव, नांदेड या तालुक्यात सर्वाधीक होता. यामुळे सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असलातरी सततच्या पावसामुळे कोवळ्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा - विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरुन नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आली आहे.

अतिवृष्टी झालेले मंडळ

सगरोळी ८४.३, कुंडलवाडी ११३.५, आदमपूर ६६.८, फुलवळ ६६.३, कलंबर ६७.५, मालेगाव ७५.८ व नरसी ६८.३

तालुकानिहाय झालेला पाऊस

नांदेड - २४.६, बिलोली ८८.३, कंधार ५४.४, लोहा ५१.४, हदगाव शुन्य, भोकर १३, देगलूर शुन्य, किनवट शुन्य, मुदखेड २२.४, माहूर शुन्य, धर्माबाद २२.३, उमरी ३५.९, अर्धापूर ७५.८, नायगाव ४७.८ सरासरी ४१ मिलीमीटर.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com