लॉटरी लागल्‍याचे अमिष दाखवून दीड लाखात फसवले

लॉटरी लागल्‍याचे अमिष दाखवून दीड लाखात फसवले
लॉटरी लागल्‍याचे अमिष दाखवून दीड लाखात फसवले
Nanded NewsSaam tv

नांदेड : नांदेडमध्ये एका भामट्याने मुरमुरा विक्रेत्याला लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून दिड लाख रूपयात फसवल्याची घटना घडली. हिमायतनगर शहरातील शंकरनगर येथे आज ही धक्कादायक (Crime) घटना घडली. (nanded news cheated Rs one and half lakh by showing the lure of winning the lottery)

Nanded News
चाळीसगावला जुगार अड्ड्यावर छापा; १८ जणांविरुद्ध गुन्हा

नांदेडमधील (Nanded) शंकरनगर येथील मुरमुरे विक्रेते विष्णू उत्त्तरवार हे सकाळी कामासाठी बाहेर निघत होते. यावेळी एक काळा टिशर्ट आणि जिन्स पॅन्ट घातलेला तरुण दुचाकीवर आला. तुम्हाला लॉटरी लागली आहे. स्कुटी आणि सोने (Gold) मिळणार आहे. तुमच्या जवळील दागिने सोनाराकडे जाऊन वजन करायचे आहे.

दुचाकीवर नेत उतरविले रस्‍त्‍यावर

तुम्ही दागिने घेऊन चला असे म्हणून त्या भामट्याने भुरळ घालून उत्तरवार यांना दुचाकीवर घेऊन घराबाहेर पडला. काही दुरवर गेल्यानंतर भामट्याने उत्तरवार यांना दुचाकीवरून उतरवले आणि भामटा सोन्याचे दागिने आणि उत्तरवार यांचा मोबाईल हिसकावून घेऊन पसार झाला. या प्रकरणी विष्णु उत्त्तरवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर (Police) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.