Nanded Politics: नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Nanded Political News Today: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना होमग्राऊंडवरच मोठा धक्का बसला आहे
nanded news Eknath shinde group big shock to congress mangesh kadam join shiv sena
nanded news Eknath shinde group big shock to congress mangesh kadam join shiv senaSaam TV

Nanded Political News Today: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना होमग्राऊंडवरच मोठा धक्का बसला आहे. नांदेडचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि मागासवर्गीय विभाग विकास काँग्रेस कमिटीचे सदस्य मंगेश कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कदम यांनी बुधवारी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेश हा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना धक्का समजला जात आहे. (Latest Marathi News)

nanded news Eknath shinde group big shock to congress mangesh kadam join shiv sena
Thane Dahi Handi 2023: टेंभी नाक्यावर रंगणार दहीहंडीचा थरार; गोविंदा पथकांवर होणार बक्षीसांचा वर्षाव, टीझर प्रदर्शित

मंगेश कदम यांच्यासह ज्योती कदम (नांदेडमधील माजी स्थायी समिती सदस्य ), अॅड. धम्मपाल कदम, विकास गायकवाड, प्रवीण वाघमारे यांच्यासह काँग्रेसमधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पक्ष उभारणीला सुरुवात केली आहे.

ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात खेचून आणण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहे. अशातच शिंदेंनी काँग्रेसला नांदेडमध्ये (Nanded Politics) मोठं खिंडार पाडलं आहे. दरम्यान, मंगेश कदम हे नांदेड जिल्हा परिषदेचे काँग्रेस पक्षाचे सहा वेळा नगरसेवक होते.

तर ज्योती कदम माजी समिती सदस्य होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित झाल्यामुळे आणि काँग्रेस पक्षाने आपला वापर करून नंतर आपल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे मत यावेळी कदम यांनी व्यक्त केले.

nanded news Eknath shinde group big shock to congress mangesh kadam join shiv sena
Maratha Reservation: ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुसरीकडे मुंबईतल्या वांद्रे पूर्व येथील भारत नगर, कला नगर, बिकेसी येथील मुस्लिम बांधव आणि भगिनींनी आज स्थानिक नेते सलिम जफर शेख यांच्या पुढाकाराने शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी काही मुस्लिम महिलांनी लोकांसाठी काम करणारे 'लोकनाथ' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनगटावर राखी बांधली.

सर्व धर्मांचा सन्मान करणारा पक्ष म्हणजे शिवसेना असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानंतर बोलताना व्यक्त केले. यावेळी सद्दाम अब्दुल सत्तार शेख, मुदशीर सिद्धीकी, शमद शेख, सलाना शेख, रेहाना काशु, आफरिन शेख, अब्दुल कादर यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com