Nanded News: जेवणात निघाल्या अळ्या; संतप्त विद्यार्थी ताट घेवून पोहचले तहसिल कार्यालयात

जेवणात निघाल्या अळ्या; संतप्त विद्यार्थी ताट घेवून पोहचले तहसिल कार्यालयात
Nanded News
Nanded NewsSaam tv

नांदेड : नांदेडमध्ये समाज कल्याण विभाग अंतर्गत शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतीगृह आहे. या वसतीगृहात राहत असलेल्‍या विद्यार्थ्यांच्‍या (Student) जेवणात अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार काल (Nanded) घडला. निकृष्ट जेवण देणाऱ्या वसतिगृह चालका विरोधात कारवाई करण्याची मागणी वसतीगृहातील संतप्त विद्यार्थ्यांनी केली. (Maharashtra news)

Nanded News
Accident News: अमळनेर बीडीओंचा अपघातात मृत्‍यू; अमळनेर – धुळे मार्गावर कारचा अपघात

नायगाव येथील शासकीय वसतीगृहात हा धक्कादायक प्रकार घडला असून, संतप्त विद्यार्थ्यांनी नायगाव तहसिलमध्ये जेवणाचे ताट नेऊन दाखविले. जेवणात अळ्या असून निकृष्टदर्जाचे जेवण देणाऱ्या चालका विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तहसिलच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणने ऐकुन घेऊन हा विषय आमच्या विभागाकडे येत नाही. तुम्ही नांदेडच्या सामाजिक न्याय विभागाकडे जाऊन तक्रार द्या; असा सल्ला दिला.

पथकाची वसतीगृहात येऊन तपासणी

विद्यार्थी आणखींच संतप्त झाले असून चांगले जेवण देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसताच समाजकल्याण विभागाचे एक पथकाने वसतीगृहात येऊन तपासणी केली आणि विद्यार्थ्यांचे म्हणने ऐकुन घेतले. चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन पथकाने विद्यार्थ्यांना दिले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com