Sanjay Biyani News: संजय बियाणी हत्या प्रकरणी पोलिसांना मोठं यश, शूटर दिपक रांगाला केली अटक

Sanjay Biyani Case news Latest Updates: संजय बियाणी हत्या प्रकरणी पोलिसांना मोठं यश, शूटर दिपक रांगाला केली अटक
Sanjay Biyani Case news Latest Updates
Sanjay Biyani Case news Latest UpdatesSaam Tv

>> संजय सूर्यवंशी

Sanjay Biyani Case news Latest Updates:

नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील प्रमूख शूटरला नांदेड पोलीसांनी पंजाब येथील कारागृहातून ताब्यात घेतले. 5 एप्रिल 2022 रोजी संजय बियाणी यांच्या शारदा नगर निवासस्थानासमोर दोघांनी गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली होती.

Sanjay Biyani Case news Latest Updates
Share Market Closing: शेअर बाजाराने केले मालामाल! निफ्टी 20,000 पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात कमावले 3 लाख कोटी रुपये

संजय बियाणी यांनी खंडणी न दिल्याने कुख्यात दहशदवादी हरविंदर सिंघ उर्फ रिंदा याने त्यांची हत्या घडवल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. एसआयटीने या प्रकरणात नांदेड मधून एकूण 17 जणांना अटक केली होती. (Latest Marathi News)

गोळ्या झाडनारे दोघे फरार होते. त्यापैकी दिपक रांगा याला गेल्या जानेवारी महिन्यात एनआयने नेपाळ बॉर्डरवर अटक केली. त्याचावर पंजाब येथील मोहाली पोलीस मुख्याल्यावर ग्रेनेड हल्ला केल्याचा आरोप होता. शिवाय अनेक प्रकरणात तो पंजाब हरियाणा, नांदेड पोलिसांना हवा होता. सद्या दिपक रांगा चंदीगड कारागृहात बंद होता.

Sanjay Biyani Case news Latest Updates
PF News: 72 तासांत तुमच्या बँक खात्यात येऊ शकतात पीएफचे पैसे, जाणून घ्या कसे...

संजय बियाणी हत्याकांडाच्या तपासासाठी नांदेड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आज दिपक रांगा याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com