वर–वधूच्‍या मंडळींना धक्‍का; वधूचे दागिने काढायला सांगितले अन्‌

वर–वधूच्‍या मंडळींना धक्‍का; वधूचे दागिने काढायला सांगितले अन्‌
वर–वधूच्‍या मंडळींना धक्‍का; वधूचे दागिने काढायला सांगितले अन्‌
marriage

नांदेड : लग्‍नाची वेळ जवळ आली असताना वधू व वर पक्षाकडील मंडळींची लगबग सुरू होती. वेळेनुसार लग्‍नही लागले. परंतु, लग्‍न मंडपात घडलेल्‍या प्रकाराने सर्वांची धावपळ सुरू झाली. वराच्‍या आईला व सर्व मंडळींना धक्‍काच बसला. यामुळे लग्न सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले. (nanded-news-Shocking-the-marriage-function-gold-jewelary-thief)

marriage
धक्‍कादायक..कर्मचाऱ्यांनीच फोडली बँक; तारण ठेवलेले दोन कोटींचे दागिने लंपास

नांदेडमध्ये हरिहर क्षीरसागर यांच्या मुलाचा विवाह नक्षत्र बँक्वेट हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. लग्नातून वराच्या आई जवळील दोन लाख रुपये किंमतीचे आठ तोळ्याचे दागिने असलेली पर्स लंपास केल्याची घटना घडलीय. लग्नात आलेल्या एका मुलाने पाळत ठेवून ही दागिन्‍याची पर्स पळवलीय.. सिसीटीव्ही च्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे.

पंडितांनी सांगितले दागिने काढायला अन्‌

उत्साहाच्या वातावरणात लग्न आटोपले. त्यानंतर पंडितांनी इतर विधी करण्यासाठी वधूला दागिने काढून ठेवण्यास सांगितले. वधूने हे दागिने काढून वराच्या आईजवळ दिले होते. आईने ते सर्व दागिने एका पर्समध्ये ठेवले अन् यावेळी नातेवाईकांकडून गिफ्ट स्वीकारतांना पर्स खाली ठेवली असतानाच तेथे उभ्या असलेल्या मुलाने ती लांबविली.

सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

एका लग्न सोहळ्यात वराच्या आईची नजर चुकवून एका मुलाने वधूचे सोन्याचे दागिने आणि रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही घटना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे लग्नसोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com