Nanded News:अरेरे! लग्नातलं जेवण बेतलं जीवावर; १५० व्यक्तींना विषबाधा

या शिळ्या जेवणाने एकूण १५० जणांनाची तब्येत बिघडली.
Nanded News
Nanded NewsSaam TV

Nanded News:नांदेडमध्ये जेवणातून १५० व्यक्तींना विषबाधा झाली आहे. लग्नासाठी गावकरी गेले असाताना तिथले शिळे जेवण खाल्ल्याने विषबाधा झालाचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या सर्व व्यक्तींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमधील (Nanded) बिलोली आणि सगरोळी या गावातील ग्रामस्थ गावातील एका लग्नाला गेले होते. लग्न म्हटल्यावर मौज मजेसह पंचपक्वाणाचा बेत असतो. अशात गावातील सर्व व्यक्ती लग्नाला आल्या होत्या. लग्न व्यवस्थीत पार पडले. तसेच त्या दिवशी लग्नात जेवून बाकीचे वऱ्हाड घरी गेले. मात्र नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी लग्नात उरलेले शिळे जेवण खाल्ले.

या शिळ्या जेवणाने एकूण १५० जणांनाची तब्येत बिघडली. यातील काहींना उलटा, जुलाब, मळमळ, डोके दुखी, पोट दुखी असे त्रास होऊ लागले. त्यामुळे यातील काहींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींवर बिलोली, शिंपाळा आणि सगरोळी येथे उपचार सुरु आहेत. सदर घटनेने गावकरी चिंतेत आहेत.

Nanded News
Nanded News : नांदेडमध्ये नेमकं चाललंय काय? आदिवासी आश्रम शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

सुदैवाने या विषबाधेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. लवकरच या रुग्णांवर पूर्ण उपचार करून त्यांना घरी पाठवले जाणार आहे. तसेच यातील काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एन लग्नाच्या सोहळ्यात हा प्रकार घडला आहे.

Nanded News
Government Married Couple Scheme : विवाहित जोडप्यांना सरकार देणार दरमहा 18500 रुपये; असा घ्या, लाभ ?

सदर विषबाधा नेमकी कशी झाली. याचे कारण फक्त शिळे जेवण होते की आणखीन काही. अशा सर्व प्रश्नांनी गावकरी चिंतेत आहेत. यासाठी वैद्यकीय तपासण्या सुरु झाल्या आहेत. रुग्णांना नेमकी विषबाधा कशी झाली याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी (Police) देखील चौकशीला सुरुवात केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com