नांदेड पोलिस ॲक्शन मुडमध्ये; बारा तलवारीसह घातक शस्त्रसाठा जप्त
वजिराबाद पोलिसांची कारवाई

नांदेड पोलिस ॲक्शन मुडमध्ये; बारा तलवारीसह घातक शस्त्रसाठा जप्त

शहराची शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे. सूचनांचा आदर करत वजिराबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणे व साठा करुन ठेवणाऱ्या व्यक्तींची तपासणी सुरु केली

नांदेड : शहरातील ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईच्या सूचना मिळताच वजिराबाद पोलिसांनी आपल्या हद्दीत असलेल्या एका दुकानावर छापा टाकून बारा धारदार तलवारी, तीन कुकरी आणि एक गुप्ती जप्त केली आहे. यावेळी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही कारवाई वजिराबाद पोलिसांनी बुधवारी (ता. १४) दुपारी केली.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यात व शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांची संख्या वाढत आहे. सर्वसाधारण वाद होताच थेट शस्त्रांचा वापर केल्या जात आहे. त्यामुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत आहे. यात विशेष करुन बालगुन्हेगार सर्सास घातक शस्त्रांचा वापर करत आहेत. व ही शस्त्र शहरात सहज मिळत आहेत. त्यावर अंकुश बसावा व शहराची शांतता बाधीत होणार नाही याची दक्षता संबंधीत ठाणेदारांनी घ्यावी अशा कडक सुचना पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेन देशमुख, डाॅ. सिद्धेश्वर भोरे यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा - जबरदस्त कारवाई- नांदेड रेंजमध्ये वाहन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. यात 22 हजार 113 वाहनांची तपासणी करुन त्यापैकी नऊ हजार ९१ वाहनावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. तर ३१ लाखाचा दंड वसूल.

शहराची शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे. सूचनांचा आदर करत वजिराबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणे व साठा करुन ठेवणाऱ्या व्यक्तींची तपासणी सुरु केली असून अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या दुकानांची यादी तयार केली आहे. त्यापैकी बुधवारी (ता. १४) आपल्या हद्दीत असलेल्या एका पवित्रस्थळाच्या परिसरातील एका दुकानावर कारवाई केली. यावेळी दुकानाचा मालक मनजीतसिंग स्वरुपसिंग सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेऊन दुकानातून बारा धारदार तलवारी, तीन कुकरी व एक गुप्ती असा सात हजाराचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी दुकानचालक मंजीतसिंग सरदारविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com