नांदेड : संत जगदीश बाबाजी गोशाळा येथे वृक्षारोपण व आरोग्य शिबीर

वृक्षमित्र फाऊंडेशन तर्फे संगोपनाची हमी घेऊन सुरक्षित ठिकाणी वृक्ष भेट देऊन लागवड करून दिली जाते.
खडकुत येथील गोशाळेत वृक्षारोपण
खडकुत येथील गोशाळेत वृक्षारोपण

नांदेड : संत जगदीश बाबाजी गोशाळा खडकूत तसेच शंकर नागरी सहकारी बँक लि. व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (ता. 12 जुलै) रोजी सकाळी 11 वाजता वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच निः शुल्क संपूर्ण आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात संत जगदीश बाबाजी, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार विजयकुमार पाटे, गोविंद बिडवई, श्रीनिवास भुसेवार, शैलेंद्र नावाडे आदी मान्यवरांच्या हस्ते 51 वृक्षांची लागवड करण्यात आली.

वृक्षमित्र फाऊंडेशन तर्फे संगोपनाची हमी घेऊन सुरक्षित ठिकाणी वृक्ष भेट देऊन लागवड करून दिली जाते. खडकूत गोशाळेचे कार्याध्यक्ष माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा यांनी वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. वृक्षमित्र परिवाराचे तसेच ए. एस. ऍग्री अँड अकॅवा ठाणे या कंपनीचे संचालक डॉ. साईनाथ हाडोळे यांनी गोशाळेस पर्यावरणपूरक 300 वृक्ष भेट दिले. या वृक्षांमध्ये कदंब, कडुनिंब, जांभूळ, फणस, पेरु, उंडी, डाळिंब आदींचा समावेश आहे. वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, प्रीतम भराडीया, प्रल्हाद घोरबांड, अरुणपाल ठाकूर, गणेश साखरे, प्रशांत रत्नपारखी, शैलेंद्र क्षीरसागर, एम.एच. मोरे, विश्वनाथ पांचाळ यांनी वृक्ष लागवड केली.

हेही वाचा - परभणीत पुरस्थिती; सततच्या पावसाने रस्ता गेला वाहून

शंकर नागरी सहकारी बँक लि. नांदेड तर्फे पाच दिवसीय मोफत आरोग्य शिबीर ठेवण्यात आले असून यामध्ये सर्व जुनाट आजारावर विना ऑपरेशन व विना इंजेक्शनद्वारे डॉ. मेघराज घुस्से हे उपचार करणार आहेत. आरोग्य शिबिरात सोमवारी 50 गरजवंतानी उपचार घेतले, याचे संपूर्ण आयोजन बँकेचे सरव्यवस्थापक विक्रम राजे व त्यांच्या टीमने केले आहे. खडकूत गाव परिसरातील तसेच नांदेड शहरातील सर्व गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com