नांदेड : उर्दू घराच्या नावाचा वाद चिघळणार; दिलीपकुमारच्या नावाला भाजपचा विरोध

नांदेड येथील उर्दू घर हे नवीन पिढीसाठी प्रेरणा दायी बनावे, त्यामुळे त्याला नाव देतांना सुद्धा सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या, सर्व सामान्यांचे जीवन जगून देशाहितासाठी आयुष्य समर्पित केलेल्या
नांदेड : उर्दू घराच्या नावाचा वाद चिघळणार; दिलीपकुमारच्या नावाला भाजपचा विरोध
नांदेडचे उर्दू घर

नांदेड : येथील उर्दू घरास अभिनेता दिलीपकुमार यांच्या नावाला भाजपचा तीव्र विरोध असून त्या ऐवजी माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी पत्रक काढुन केली. Nanded- Urdu- house- name- dispute- to- simmer-BJP- opposes- Dilip- Kumar's- name

नांदेड येथील उर्दू घर हे नवीन पिढीसाठी प्रेरणा दायी बनावे, त्यामुळे त्याला नाव देतांना सुद्धा सामाजिक बांधीलकी जोपासनाऱ्या, सर्व सामान्यांचे जीवन जगून देशाहितासाठी आयुष्य समर्पित केलेल्या तसेच भारताला परकीय आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अणुबॉम्बच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका असलेल्या माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव न देता त्याऐवजी सध्याच्या पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या भारतात येवून केवळ चित्रपटात हीरोची भूमिका करुन नाव व पैसा कमावलेल्या व पाकिस्तानशी आपुलकी ठेवलेल्या दिलीप कुमारच्या नावाला नांदेड भाजपने तिव्र शब्दात विरोध दर्शविला आहे.

हेही वाचा - नांदेड येथील पत्रकार जयपाल गायकवाड यांनी आपल्या विवाह सोहळ्यात कोरोना काळात उपयोगी येणारे दीड लाख किमतीचे दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नांदेड बुद्धिस्ट असोशिएशनला मोफत दिले.

कुठल्याही प्रकारची सामाजिक बांधीलकी न जोपासलेल्या फक्त फिल्मी हीरो दिलीप कुमारच्या नावाला भाजपचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे महाआघाडातील घटक पक्षाचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासारख्या जातीवादी नेत्याने दिलीप कुमारच्या नावाची जी घोषणा केली त्याचा भाजपच्या वतीने निषेध करतो. व उर्दू घरास डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची विनंती करतो, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com