नांदेड : पिस्तूल, ‌बंदूकीसह युवकास अटक- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नांदेड शहर व परिसरात अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार सक्रिय झाल्याने ते शांतता भंग करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत.
नांदेड : पिस्तूल, ‌बंदूकीसह युवकास अटक- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नांदेड : हातात घातक शस्त्र वापरुन परिसरात दहशत बसविणाऱ्या एका युवकास अटक करुन त्याच्याकडून पिस्तूल, एअर गन ( बंदूक ) आणि दोन जीवंत काडतुस जप्त केले आहे. ही कारवाई देगलूर नाका परिसरात गुरुवारी ( ता.15 ) जुलै रोजी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. अटक आरोपीविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदेड शहर व परिसरात अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार सक्रिय झाल्याने ते शांतता भंग करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. अशा गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी नांदेड पोलिस सक्रिय झाले आहेत.

हेही वाचा - रत्नागिरीत भाती शेती धाेक्यात; पुढचे 18 तास महत्वाचे

गुरुवारी दुपारी साडेचारच्या सूमारास देगलूरनाका नांदेड येथे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीवरुन अस्लमखान आगाखान पठाण (वय २८) रा. अदनान कॅालनी, धनेगाव, नांदेड याला ताब्यात घेतले. त्याचेकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस आणि एक एअर गन जप्त केली. त्याच्याविरुध्द इतवारा पोलिस ठाण्यात दिलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या फिर्यादीवरुन गून्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, सहाय्यक फौजदार जसवंतसिंह शाहू, शंकर म्हैसनवाड, तानाजी येळगे, दशरथ जांभळीकर, बालाजी तेलंग यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पथकाचे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांनी कौतूक केले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com