परभणी जिल्ह्यातून हरविलेला बालक नांदुऱ्यात; आई– मुलाची भेट

परभणी जिल्ह्यातून हरविलेला बालक नांदुऱ्यात; आई– मुलाची भेट
missing
missingsaam tv

नांदुरा (बुलढाणा) : मंतिमंद असलेला व मागील तीन दिवसांपासून परभणी जिल्ह्यातील पुर्ना गावातून हरवलेल्या दहा वर्षाच्या बालकाची व त्याच्या आई-वडीलांची भेट घालुन दिल्याचा सुखद प्रकार बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात आज घडला. नांदुरा (Nandura) येथील रेल्वे सुरक्षा बलाचे शिवाजी ढगे आणि वर्धा पुलगाव येथील रंजन तेलंग या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून बालकाला आईकडे सुपुर्द केला. (nandura news Missing child from Parbhani district in Nandura)

missing
हृदयद्रावक..बाळाचा चेहरा बघण्याआधीच आईचा मृत्यू

परभणी (Parbhani) जिल्ह्यातील पूर्णा येथील एक दहा वर्षाचा गोलु नामक मुलगा जन्माने मतिमंद पण पूर्णा गावातील सर्वांचाच तो अतिशय लाडका. गोलू हा तीन दिवसांपूर्वी अचानक गायब झाला होता. याबाबत नातेवाईकांनी पोलिसात तक्रार नोंदवली. तर गावातील प्रत्येक नागरिकाने गोलूचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर (Social Media) मोहीम राबवत त्याचा फोटो व्हायरल केला.

असा लागला शोध

दरम्यान शनिवारी (२२ जानेवारी) रात्री एक १० वर्षाचा मुलगा रेल्वे स्टेशनवर थंडीत कुडकुडत असतांना कर्तव्यावर असलेल्या आरपीएफचे प्रधान आरक्षक शिवाजी ढगे यांना दिसला. त्‍यांनी सदर बालकाची आस्थेने विचारपूस करीत त्याला थंडीपासून बचावासाठी अंथरून आणून दिले. मतिमंद असल्याने त्याच्याकडून मिळेल; ती माहिती घेऊन वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील विशेष आरपीएफमध्ये खुफिया शाखेचे माजी प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांची मदत घेत परभणी जिल्ह्यातील रेलवे सुरक्षा बलाला कळविण्यात आले. गोलूच्‍या पालकांचा शोध लावण्यात आला. दरम्यान आज त्याचे आई राणी भीमराव सोनकांबळे ह्या नांदुरा रेल्वे स्थानकावर पोहचल्या. यावेळी रेलवे सुरक्षा बलाने हरविलेल्या गोलूला आईच्या सुपूर्द केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com