पावसाची ओढ; पीक वाचवण्यासाठी शेतकरी देताहेत चुवा

पावसाची ओढ; पीक वाचवण्यासाठी शेतकरी देताहेत चुवा
पावसाची ओढ; पीक वाचवण्यासाठी शेतकरी देताहेत चुवा
Farmer

खेडदिगर (नंदुरबार) : पाऊस रुसला, शेतकरी पेरणीकरून फसला. करपलेली पीकेपाहुन, होतोय व्याकूळ. उगवलेल्या बीज अंकुरास वाचवण्याची धडपड धडपड चालू असून चुवा देत आहे. (nandurabar-news-last-three-weeks-no-rain-and-farmer-cotton-seeds-water)

पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट सतावत आहे. बीजलागवड केल्याने ते आता संकटात सापडले आहे. पावसाळ्यात मे हिट सारखे ऊन तापत आहे. त्‍यामुळे पिके कोमेजली आहेत. चुवा म्हणजे कृत्रिमनपद्धतीने पाणी देण्याचे काम करीत आहे. राष्ट्रीय मोसम विभागाचे दावे रोज फोल जात असून त्यावर विश्वास ठेवत केतीकतरी शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.

Farmer
बंद असलेली आंतरराज्य बससेवा पुन्हा सुरू. गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कोमेजलेले पीक पाहून अस्‍वस्‍थ

कोरोना महामारीमुळे आधीच आर्थिक चन चन असून उसनवारी, कर्ज घेत, दागिने गहाण ठेवत, जनावरे विकून जमेल तसे बियाण्याची सोय करून लागवड केलेला शेतकरी राजा कोमेजलेले पीक पाहून अस्वस्थ झाला आहे. हवामान विभागाने १० जुलैपर्यंत सर्वत्र पाऊस पडेल असे भाकीत वर्तविले आहे ते खरे ठरले तर उत्तमच नाहीतर शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडेल हे मात्र नक्की.

अंकुरलेल्या बीजास वाचवण्याची धडपड सुरू आहे. निसर्गाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांना संकटात टाकत असतो. बियाणे खते यांच्या वाढलेल्या किमती पाहता दुबार पेरणी करणे अनेकांना शक्‍य नाही अशीच स्‍थिती आहे. शासनाने काही मदत करावी.

- महेंद्र मतकर, शेतकरी खेडदिगर

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com