Accident: वापी– धुळे बसची दुचाकीला धडक; महिला ठार

वापी– धुळे बसची दुचाकीला धडक; महिला ठार
Accident News
Accident NewsSaam tv

नंदुरबार : राष्ट्रीय महामार्गावरील डी. जे. अग्रवाल इंग्लिश मीडियम शाळेजवळ खड्डे चुकवण्याच्या नादात वापी– धुळे बसने स्कूटरला धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाले आहेत. (Nandurbar news MSRTC Bus Accident)

Accident News
Jalgaon: मंगळग्रह देवस्थानावर चक्क २५ प्रकारच्या भजींचा महाप्रसाद

कल्पनाबाई शरद पाटील (वय 33) असे मयत महिलेचे नाव आहे. ते धार्मिक कार्यक्रमासाठी नातेवाईकांच्या घरी मोटरसायकल (क्र. जीजे. १९, एआर ८६४४) दाम्पत्य आपल्या गावी जात होते. दरम्यान मागून येणारी साक्री डेपोची वापी- धुळे बस (क्र. एमएच. 20, बीएल 3425) चालकाने खड्डा चुकवण्याच्या नादात स्कूटरला जोरदार धडक दिली.

बसच्‍या मागच्‍या चाकात आल्‍याने मृत्‍यू

अपघातात स्कूटरवर मागच्या बाजूला बसलेली महिला बसचा मागच्या टायरमध्ये आल्याने जागीच ठार झाल्याचे दुर्दैवी घटना आहे. घटनास्थळी तात्काळ नवापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या पथकाने धाव घेत जखमींना मदत केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com