Nandurbar: बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार तर ६ जखमी

बोलेरो व मोटरसायकलचा हा भीषण अपघात झाल्यानंतर बोलेरो गाडी तीनदा उलटली याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Accident
Accident Saam TV

नंदुरबार: शहादा लोणखेडा बायपासवर फोरव्हीलर व मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. तर बोलेरो गाडीतील 6 जण जखमी झाले आहेत यापैकी एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहादा लोणखेडा बायपास रस्त्यालगत असलेल्या पाटीदार मंगल कार्यालयासमोर बोलेरो (क्र. एम. एच. 39, जे. 3790) सिंधिदिगर येथील रहिवासी होते. तर कळंबू येथील दोघे म्हसावद येथे लग्नासाठी दुचाकीने ( क्र. एम. एच. 39, पी.8554 ) ने जात असताना बोलेरो व मोटारसायकलची समोरा समोर धडक झाली.

या अपघातात दुचाकीस्वार अजय सुभाष मोरे (25) रा. कळंबू ता. शहादा याचा जागीच मृत्यू झाला तर सागर सोमा सोनवणे रा.कळंबू ता. शहादा यांना गंभीर दुखापत झाली त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोलेरो व मोटरसायकलचा हा भीषण अपघात झाल्यानंतर बोलेरो गाडी तीनदा उलटली याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान या बोलेरो गाडीतील ५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती शहादा पोलिसांनी दिली आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातस्थळी शहादा पोलिस दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com