Nandurbar News: आरोग्य यंत्रणा सलाईनवर; नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तीन महिन्यांत १७९ बालमृत्यू

Nandurbar Child Death Report: बालमृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे.
Nandurbar News
Nandurbar NewsSaamtv

सागर निकवाडे, प्रतिनिधी

Nandurbar News: नंदुरबार जिल्हा रुग्णालय मधील अपूर्ण साधनसामग्री आणि रिक्त पदांमुळे बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या बालमृत्यूंचे धक्कादायक चित्र समोर आले असून मागील तीन महिन्यात 179 बालमृत्यू झाले असल्याचे धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. बालमृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे.

Nandurbar News
Aditya Thackeray News: 'सरकारकडून अपेक्षा नाहीत; नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी भांडणे...' आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार (Nandurbar) जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून 70% लोकसंख्या हे आदिवासींची आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा सलाईनवर असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यभरात कुपोषित बालकांची संख्या 28 हजार असून त्यापैकी 23 हजार बालके ही नंदुरबार जिल्ह्यातील आहेत.

जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूच्या प्रश्न गंभीर असून मागील तीन महिन्यात 179 बालमृत्यू झाले असल्याचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. या बालमृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या गंभीर असून जिल्हा रुग्णालयात असलेल्या सुविधा अपूर्ण आहेत. जिल्हा रुग्णालयात असलेल्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात 20 जागांची कॅपॅसिटी असताना 84 बालक उपचार घेत असल्याचा गंभीर प्रकार आमदार पाडवी यांनी समोर आणला आहे. जिल्हा रुग्णालयातील रिक्त पद आणि अपूर्ण सुविधा यामुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचा प्रमाण वाढला असल्याचेही पाडवी म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

Nandurbar News
Mother Killed Baby: नात्याला काळिमा! जन्मताच पोटच्या गोळ्याला आईने संपवले, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com