Nandurbar: युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दोन दिवसांपुर्वी हत्‍या झाल्‍याचा अंदाज

युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दोन दिवसांपुर्वी हत्‍या झाल्‍याचा अंदाज
Nandurbar Crime News in Marathi, Nandurbar latest Marathi News
Nandurbar Crime News in Marathi, Nandurbar latest Marathi News Saam tv

नंदुरबार : धडगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील हरणखुरी व सोमाणा परिसरातील डोंगराळ भागात अज्ञातस्थळी २५ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून सदर युवतीची दोन दिवसांपुर्वी हत्‍या (Crime News) झाल्‍याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (nandurbar crime news death body of a 25 year old girl was found)

Nandurbar Crime News in Marathi, Nandurbar latest Marathi News
भोंग्याच्या मुद्द्यावर मनसे ठाम; पोलीस अ‍ॅक्टीव मोडमध्ये, राज्यभरातील मनसैनिकांची धरपकड सुरुच

कुंडल (ता. धडगाव) परिसरात २५ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. ललिता मोतीराम पाडवी असे सदर युवतीचे नाव असून ती शिरपूर (Shirpur) येथे कंपनीत कामात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर युवतीचा बलात्कार करून खून झाला असल्याचा अंदाज असून डोक्यावर दगडाने ठेचल्याच्या खुणा आहेत. उन्हामुळे शरीर काळवट पडलेल्या अवस्थेत मृतदेह आहे. (Nandurbar Crime News in Marathi)

आई–वडीलांना केला होता फोन

शिरपुरहून शहादामार्गे (Shahada) धडगाव येत असल्याचा फोन ललीता हिने आई– वडिलांना केला होता. यानंतर मात्र सदर युवतीचा मोबाईल फोन बंद येत होता. यामुळे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्‍या मुलीचा शोध आई- वडील करीत होते. दरम्‍यान आज सदर युवतीचा मृतदेह आढळून आला. धडगाव पोलीस (Police) घटनास्थळी दाखल अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळावरून पाचशे मीटर अंतरावर ब‌ॅग कागदपत्रे व इतर सामान आढळून आल्याने मृतदेहाचा तपास लागला. धडगाव पोलिसांच्या मदतीने सदर युवतीचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या रिपोर्टनुसार अधिक तपास लागण्याची शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com