Nandurbar: भरदिवसा चोरीच्या इराद्याने आलेल्या चोरट्यांचा डाव फसला; घरमालकानेच एकाला पकडले

भरदिवसा चोरीच्या इराद्याने आलेल्या चोरट्यांचा डाव फसला; घरमालकानेच एकाला पकडले
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : भरदिवसा दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास स्टेट बॅंकेच्या मागील बाजूस शिक्षक दाम्पत्याकडे चार ते पाच इसमांनी चोरीचा प्रयत्न केला. परंतु, चोरट्यांनी प्रवेश करून (Theft) चोरीचा प्रयत्न करत असताना दीपक जयस्वाल कामा निमित्त घरी आले असता चोरीचा प्रयत्न फसला आहे. (Nandurbar Crime News)

Nandurbar News
Dhule News: तब्बल किलो वजनाचा मुतखडा; धुळ्यात यशस्वी शस्त्रक्रिया

नंदुरबार (Nandurbar) शहरात आठवडाभरात दुसरी चोरीच्या प्रयत्न झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात उच्चभ्रू वस्ती असलेल्या घाचीवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास चड्डी बनियन धारी गँग चोरीचा प्रयत्न करत असताना (CCTV) सीसीटीव्‍ही कॅमेरात कैद झाले होते. स्टेट बॅंक (Bank) परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो; अशा उच्चभ्रू वस्तीत भरदिवसा घडलेल्या ह्या घटनेने भीती निर्माण झाली असून पोलिसांकडून अजून एका अल्पवयीन संशयित आरोपीला अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे.

चोरट्यांशी झटापट

चोरटे चोरीच्‍या प्रयत्‍नात असताना दीपक जयस्वाल यांनी चोरट्यांशी दोन हात करत एकाला पकडण्यात यश मिळाले आहे. चोरट्याला पोलिसांनी नव्हे तर प्राफेसरने पकडले अशी एकच चर्चा रंगली असून पकडलेल्या चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com