Nandurbar: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 19 जणांवर हद्दपारीची कारवाई!

जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे प्रथमचं अशी कारवाई...
Nandurbar: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 19 जणांवर हद्दपारीची कारवाई!
Nandurbar: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 19 जणांवर हद्दपारीची कारवाई!दिनू गावित

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार NAndurbar जिल्ह्यातील 14 जणांना 2 वर्षांसाठी तर 5 जणांना तब्बल 1 वर्षांसाठी हद्दपार Deportation करण्यात आले आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असुन 19 लोक हद्दपार झाल्याने पोलीसांच्या Deportation of Criminals by Nandurbar Police या धडाकेबाज कारवाईचे स्वागत केलं जात आहे.

हे देखील पहा-

गेल्या अनेक वर्षापासून सण-उत्सव काळात जाती धर्मावरून दंगली होण्याचे प्रमाण जास्त होते. परंतु जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी गेल्या दोन वर्षांत दंगली घडवून आणणाऱ्या नागरिकांवर खाकी वर्दीची धाक दाखवून जिल्ह्याला दंगल मुक्त करण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

Nandurbar: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 19 जणांवर हद्दपारीची कारवाई!
साकीनाका बलात्कार प्रकरणाचं गुढ वाढलं; कटात दोघे सामील असल्याचा संशय

गुन्हेगार प्रवृत्तीच्या नागरिकांवर People with criminal tendencies कायमचा आळा बसावा यासाठी आगामी सण उत्सव लक्षात घेता जिल्हा पोलीसांनी सदरची कारवाई केली असुन यातील 14 इसम हे नंदुरबार शहरातील तर 5 इसम हे शहादा शहरातील रहिवाशी आहेत. विशेष म्हणजे पोलीसांनी आणखीन काही जणांच्या हद्दपारीची प्रक्रीया चालवली आहे. अक्कलकुवा मधील एकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई देखील केली जात आहे. या सर्वांना 48 तासांच्या आत नंदुरबार सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com