Nandurbar : जिल्हा परिषदेतील स्थायी समितीत खडाजंगी!

नंदुरबार, जिल्हा परिषदेतील स्थायी समितीत सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याचे आज पाहायला मिळाले, अधिकाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा वचक नसल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.
Nandurbar : जिल्हा परिषदेतील स्थायी समितीत खडाजंगी!
Nandurbar : जिल्हा परिषदेतील स्थायी समितीत खडाजंगी!दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेतील स्थायी समितीच्या सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांनी केल्याने खळबळ उडाली. काही काळ दोघांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद सदस्यांना अधिकारी योग्य ती माहिती व मंजूर झालेल्या कामांचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करत नसल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांनी केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्यामुळे विकास कामे होत नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

हे देखील पहा :

अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी यांनी मागच्या दोन सभेमध्ये डेब्रामाळ येथील नळपाणी योजनेबाबत विचारणा केली आहे, परंतु अधिकारी माहिती घेऊन सांगतो, एवढेच उत्तर देतात. आजही त्यांनी प्रश्न उपस्थित केला परंतु त्यांना योग्य ते उत्तर मिळाले नाही. जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांनी देखील ठाणेपाडा येथील आश्रम शाळेत पाणी योजनेसाठी आदिवासी विभागाने 30 लाख मंजूर केले आहे, परंतु जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता ही योजना राबवत नसल्यामुळे आश्रम शाळेतील कर्मचारी व विद्यार्थ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Nandurbar : जिल्हा परिषदेतील स्थायी समितीत खडाजंगी!
"जिल्ह्याची मान उंचावणारं काम करा; बहीण आहे, शाब्बासकी देईल" : पंकजा मुंडे

ही योजना कधी राबवणार आहे, याबाबत प्रश्न उपस्थित केला परंतु अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन सांगतो, एवढंच उत्तर दिलं. जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांना अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचे सभागृहाला सुनावले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनीही मान्य करत सदस्यांनी विचारलेली माहिती व्यवस्थित देऊन कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य खुर्चीवर कडक अधिकारी येत नाही तो तोपर्यंत विकासकामे होणार नाही अशी प्रतिक्रिया देवमन पवार यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.