नंदुरबार जिल्‍हा कोरडा अन्‌ तापी नदी वाहतेय दुथडी
तापी नदीतापी नदी

नंदुरबार जिल्‍हा कोरडा अन्‌ तापी नदी वाहतेय दुथडी

नंदुरबार जिल्‍हा कोरडा अन्‌ तापी नदी वाहतेय दुथडी

सारंगखेडा (नंदुरबार) : राज्‍यातील अनेक भागांमध्‍ये पावसाची प्रतिक्षा होती. आठवडाभरापासून पावसाला सुरवात झाली असून, राज्‍यातील काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. तर काही भाग अजूनही देखील कोरडेच आहेत. यात नंदुरबार जिल्‍ह्याचा समावेश होत असून, जिल्‍हा कोरडा असला तरी तापी नदीच्‍या उगमस्‍थान परिसरात पाऊस झाल्‍याने नदी दुथडी वाहत असल्‍याचे सुखद चित्र पाहण्यास मिळत आहे. (nandurbar-district-rain-not-droped-but-tapi-river-full-water)

जिल्ह्यात अद्याप अपेक्षित पावसाला सुरुवात झालेली नाही. मात्र जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी असलेली तापी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. तापीच्या उगम आणि जोडणी क्षेत्रात पाऊस झाल्याने हतनूर धरणाचे दरवाजे खुले करण्यात आले, पर्यायाने तापी पात्रात भरपूर पाणी आहे. मात्र तिच्या अनेक उपनद्या अद्यापही कोरड्या आहेत.

तापी नदी
युवकाचा देशी जुगाड..कार धावते एक रूपयात ५० किमी

नदीला पाणी पाहून समाधान

तापी पात्रातील पाणी बघून शेतकरी राजा आनंदी होत पाऊस होत असलेल्या भागातील शेतकऱ्यांशी आनंदाने संवाद साधीत आहे. मात्र, दुसरीकडे परिसरात अजूनही पेरणी योग्य पाऊसच नसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची झालर दिसत आहे.

तापी नदी
आघाडी सरकारमधील शाब्दिक चकमकीवर अनिल गोटेंचे पत्र; विरोधकांसह सत्‍ताधारींवर निशाणा

पावसासाठी मागितला जातोय जोगवा

परिसरात आतापर्यंत पाऊस अंधळी कोशिंबीरचा डाव खेळत आहे. पाऊस कोठे बरसत आहे तर कोठे नुसतेच ढग दाटून येत आहेत. अद्यापही बहुसंख्य गाव शिवारात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. गावागावात वरूण राजा बरसावा म्हणून जागरणासह जोगवा मागितला जात आहे. तापीच्या उगमस्थानी पाऊस झाल्याने हतनूर धरणाचे १६ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीला पुर आला आहे. सारंगखेडा प्रकल्पाचे दहा दरवाजे आज (ता. १४) पहाटे उघडण्यात आल्याने पर्यायाने तापी दुथडी भरून वाहत आहे. मात्र परिसरात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. एकीकडे पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट तर जीवदान मिळालेल्या पिकांच्या वाढी खुंटल्या आहेत.

तापी काठावर पावसाची प्रतिक्षा

हतनुरसह सारंगखेडा प्रकल्पाचे पाणी सोडल्याने तापी नदी दुथडी वाहू लागली आहे. सारंगखेडा ते प्रकाशा दरम्यान तापी काठावरील अनेक गावांमध्ये पाऊसाने दडी मारली आहे. त्यामुळे पावसाची एकूणच स्थिती पाहता दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद व्यक्त करताना आपले दु:ख कसे व्यक्त करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com