नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 33 टक्केच पाऊस !

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत उशिरा पावसामुळे खरीप हंगामाला उशिरानेच सुरुवात झालेली आहे, परंतु यंदा जुलै महिन्याच्या दहा दिवसानंतरही दमदार पावसाचं आगमन झालेले नाही.
नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 33 टक्केच पाऊस !
नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 33 टक्केच पाऊस !SaamTv

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत उशिरा पावसामुळे खरीप हंगामाला उशिरानेच सुरुवात झालेली आहे, परंतु यंदा जुलै महिन्याच्या दहा दिवसानंतरही दमदार पावसाचं आगमन झालेले नाही. त्यामुळे सर्वत्र पेरण्या खोळंबलेल्या आहेत. Nandurbar district receives only 33% rainfall so far!

कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यातील कापूस, भात, सोयाबीन, मका, तुर, उडीद, मूग या प्रमुख पिकांसाठी ३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी नियोजित आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त 65 हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत.

हे देखील पहा -

यंदाच्या खरीप हंगामात गेल्या 40 दिवसात जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे ७० ते ८० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्या असे आव्हान कृषी विभागाने केले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत फक्त २०५ मिलीमीटर सरासरी पर्जन्यमान झालेलं आहे. आणखी पुढील काही दिवस पावसाने दडी मारल्यास खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 33 टक्केच पाऊस !
अकोल्यातील 'त्या' सहा सिमेंट रस्त्यांचे पिंडदान ! 'आप' चे अनोखे आंदोलन

दुबार पेरणी व बियाण्यांचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्या असे आवाहन कृषी विभागाने वारंवार शेतकऱ्यांना केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कमी पर्जन्यावर शेतकऱ्यांकडून साडेबावीस टक्के पेरण्या पूर्ण केलेली आहे. या पिकांना दमदार पावसाची अत्यंत गरज आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com