Nandurbar Farmer Crisis News: सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांवर खरीप हंगामात अस्मानी संकट; शरद पाटलांचे सरकारवर टीकास्त्र...

Farmer News: शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई न मिळाल्याने खरीप हंगामातील भांडवल उभे कसे करावे असा प्रश्न...
Nandurbar Farmer Crisis News
Nandurbar Farmer Crisis NewsSaam Tv

सागर निकवाडे

Nandurbar News Today: मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यात उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून लगेच नुकसान भरपाई देण्याच्या आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, सरकारने अजूनही कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई न दिल्याने आणि रब्बी हंगामातील आर्थिक गणित चुकल्याने खरीपासाठी भांडवल कुठून उभं करावे असा प्रश्न शेतकऱ्यांचा समोर आहे. (Latest Marathi News)

Nandurbar Farmer Crisis News
Kandivali Firing Update: कांदिवली लालजीपाड्यात गोळीबार करणाऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक, हत्येमागचं धक्कादायक कारण उघड

एकीकडे नैसर्गिक तर दुसरीकडे सरकारच्या सुलतानी संकट शेतकऱ्यांसमोर उभे असून खरीप हंगामासाठी भांडवल आणावे कुठून असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गट शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांसाठी मोठा लढा उभारण्याचा निर्धार नंदुरबारचे नवनिर्वाचित संपर्कप्रमुख शरद पाटील यांनी केलाय.

खरीप हंगामाला अवघे काही दिवस बाकी आहेत. राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना (Farmer) कर्ज देण्यासाठी हात आखडता घेत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा बँकांकडून पिक कर्ज दिला जात आहे. तेही शेतकऱ्यांना नाममात्र कर्ज दिले आहे. त्यात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून (Bank) दिल्या जाणाऱ्या कर्जात दरवर्षी दहा टक्क्याने वाढ होणे अपेक्षित आहे, तसे होत नाही. तर दुसरीकडे सरकारने अवकाळीमुळे (Rain) झालेल्या नुकसानीचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात न टाकल्याने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी भांडवल आणावे कुठून असा प्रश्न आहे.

Nandurbar Farmer Crisis News
Mahabaleshwar ला मान्सून पूर्व पावसानं झाेडपलं, वाई, केळघरात झाडं पडली; जावळीतील गावं अंधारात

सरकार फक्त आश्वासन देत आहेत. या खरीप हंगामात शेतकरी आसमानी संकटापेक्षा सुलतानी संकटामुळे बेजार होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारने आश्वासन देण्यापेक्षा शेतकऱ्यांना लगेच मदत करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या संपर्कप्रमुख माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी केली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com