नंदुरबार: अखेर तीन दिवसाचा पाहुणचार घेऊन आयकर विभागाचे पाहुणे परतले

तीन दिवसाच्या कारवाईत नेमकी काय कारवाई केली याबाबत अस्पष्टता कायम
नंदुरबार: अखेर तीन दिवसाचा पाहुणचार घेऊन आयकर विभागाचे पाहुणे परतले
नंदुरबार: अखेर तीन दिवसाचा पाहुणचार घेऊन आयकर विभागाचे पाहुणे परतलेदिनू गावित

नंदुरबार - जिल्ह्यातील समशेरपूर येथे स्थित आयान मल्ट्रीट्रेड एल एल पी साखर कारखान्यावर Sugar Factory आयकर विभागाने धाड टाकून सलग तीन दिवस तपासणी केली. तब्बल 70 तासानंतर आयकर विभागाचे अधिकारी उशिरा रात्री दहा वाजता कारखान्याच्या बाहेर पडले. सलग तीन दिवस केलेल्या या कारवाईमध्ये आयकर विभागाच्या Income Tax Department हाती काय लागले याबाबत साखर कारखाना प्रशासन व आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

हे देखील पहा -

गेले तीन दिवस आयकर विभागाचे अधिकारी कारखान्यात ठाण मांडून बसले होते. 2014 -15 साली अवसायनात गेलेला हा साखर कारखाना वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 150 कोटीहून अधिक किंमतीची मालमत्ता असलेला कारखाना फक्त 47 कोटीमध्ये पुणे येथील ऑस्ट्रेरीया ऍग्रो कंपनीला विक्री कशी केली याबाबत त्यावेळी आरोप झाले होते. हा कारखाना खरेदीसाठी पुणे मध्यवर्ती बँकेने कोट्यवधींचे कर्ज देखील वितरीत केले होते.

नंदुरबार: अखेर तीन दिवसाचा पाहुणचार घेऊन आयकर विभागाचे पाहुणे परतले
Drugs Case मध्ये राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्तीचा समावेश!

गेल्या तीन वर्षांपूर्वी या साखर कारखान्याला आयान मल्टीट्रेड एलएलपी असे नाव देण्यात आले आहे. सचिन शृंगारे नामक व्यक्तीच्या नावावर हा कारखाना असून सदर व्यक्ती पार्थ पवारांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. गेल्या तीन दिवसापासून सदर कारखान्यावर आयकर विभागाने धाड टाकून मोठ्याप्रमाणावर कागदपत्रांची तपासणी केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र गेल्या तीन दिवसांमध्ये आयकर विभागाने नेमकी काय कारवाई केली याबाबत अद्यापही अस्पष्टता असली तरी पवार कुटुंबियांच्या निकटवर्तीय असलेले सचिन शृंगारे यांच्या आयान मल्टीट्रेड कंपनी मध्ये आलेले पाहूणे अखेर पाहुणचार घेऊन परतले आहे असेच म्हणावे लागेल.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.