नंदुरबारमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व मोहल्ला कमिटीची बैठक

यापूर्वी नंदुरबारमध्ये सण-उत्सवाच्या काळात जातीय व धार्मिक तेढ निर्माण होऊन दंगल सदृश्य परिस्थिती बऱ्याचदा निर्माण झाली आहे.
नंदुरबारमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व मोहल्ला कमिटीची बैठक
नंदुरबारमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व मोहल्ला कमिटीची बैठकदिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार शहरातील गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता सण उत्सवाच्या काळात जातीय तेढ निर्माण होऊन दंगल सदृश्य परिस्थितीचा सामना नागरिक व प्रशासनाला करावा लागला आहे.

हे देखील पहा -

बकरी ईद व येणारा गणेशोत्सव सण साजरा करण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे नागरिकांनी पालन करावे; तसेच सण उत्सव शांततेत साजरा करावे. या उद्देशाने शहरातील सर्वधर्मीय समुदायाला पोलिस प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक बोलावून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी सण-उत्सव शांततेत व शासनाच्या नियमांचे पालन करून साजरे करावे असे आव्हान नागरिकांना केले.

नंदुरबारमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व मोहल्ला कमिटीची बैठक
Corona | चिंताजनक ! ४० कोटी भारतीयांना अजूनही कोरोनाचा धोका

उपस्थित शांतता कमिटीच्या सदस्यांनी देखील यावेळी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. तसेच एखादी घटना घडल्यास पोलिसांनी पूर्ण चौकशी करूनच गुन्हे दाखल करावे. घटनेची पूर्ण माहिती न घेताच गुन्हे दाखल केले जातात त्यामुळे आणखी तेढ निर्माण होऊन परिस्थिती बिघडते. त्यामुळे पोलिसांनी देखील सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन सदस्यांनी यावेळी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com