Nandurbar : नवापूर तालुक्यात तुफान पाऊस; नदी नाल्यांना पूर!

विशेष म्हणजे या परिसरातील नद्यांना पावसाळा संपल्यानंतर पहिला पूर आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Nandurbar : नवापूर तालुक्यात तुफान पाऊस; नदी नाल्यांना पूर!
Nandurbar : नवापूर तालुक्यात तुफान पाऊस; नदी नाल्यांना पूर!दिनू गावित

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील पूर्वेकडील विसरवाडी भागातील सोनखांब, तिळासर, जामनपाडा, निमदर्डा, पानबारा, मोरकरंजा, बर्डीपाडा गावांसह कोंडाईबारी घाटात तासभर मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात पाणी साचल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हे देखील पहा :

विशेष म्हणजे या परिसरातील नद्यांना पावसाळा संपल्यानंतर पहिला पूर आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्या अनुषंगाने नवापूर तालुक्यातील पूर्वभागात मुसळधार पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर आला आहे. निमदर्डा गावातील नदीला पूर आल्याने रस्ता पाण्याखाली गेल्याने गावातील संपर्क तुटला आहे.

Nandurbar : नवापूर तालुक्यात तुफान पाऊस; नदी नाल्यांना पूर!
Nandurbar : खा. गावितांच्या पिंगाणे ग्रामस्थांचे आमरण उपोषण मागे!

बर्डीपाडा गावातील नदीला आलेल्या पुरात फरशी पुलल वाहून गेल्याने ग्रामस्थांना दळणवळणाची समस्या निर्माण झाली. नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जोरदार पावसाने परिसरातील सोयाबीन व ज्वारी या पिकांचे किरकोळ नुकसान झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.