नंदुरबार : जिल्ह्यातील चार आगारातील २३ कर्मचारी निलंबित

नंदुरबार : जिल्ह्यातील चार आगारातील २३ कर्मचारी निलंबित
नंदुरबार : जिल्ह्यातील चार आगारातील २३ कर्मचारी निलंबित

नंदुरबार : जिल्ह्यात ३ नोव्हेंबर मध्यरात्रीपासून संप पुकारून काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या २३ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Nandurbar-news-23-st-employees-suspended-in-four-depots-in-the-district)

नंदुरबार : जिल्ह्यातील चार आगारातील २३ कर्मचारी निलंबित
मग भाडे आकारणी संदर्भात नियम का नाही?; संतप्त प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल

राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही. अखेर एसटी महामंडळाच्या विभागीय पातळीवरून गुरुवारी कारवाईचा बडगा उगारत नंदुरबार जिल्ह्यातील ४ आगारांतील २३ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

चारही आगारातील कर्मचारींचा समावेश

निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नंदुरबार बस आगारातील ५ तर शहादा आगारातील ६, नवापूर आगारातील ५ तर अक्कलकुवा आगारातील ७ जणांचा समावेश आहे. राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव - खेड्यातील प्रवासीवर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे; यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या जिल्ह्यातील ४ आगारांमधील वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com