Accident: कारने दुचाकीस्वारांना उडवले; दोघे गंभीर जखमी, कार चालक फरार

कारने दुचाकीस्वारांना उडवले; दोघे गंभीर जखमी, कार चालक फरार
Accident
Accident Saam tv

नंदुरबार : धडगाव– शहादा रस्त्यावरील दरा पिपराडी गावाजवळ दुचाकी व स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात झाला आहे. कार चालकाने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. (Nandurbar Accident News)

धडगाव– शहादा रस्‍त्‍यावरील झालेल्‍या अपघातात नवलसिंग महादू पावरा (रा. रोशमाळ बु.) व रतिलाल कलशा पाडवी (रा. कुंडल, ता. धडगाव) हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यात ते गंभीर जखमी झाले आहे. घटनास्थळी म्हसावद पोलीस दाखल झाले असून जखमींना तत्काळ म्हसावद ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याबाबत अधिक तपास म्हसावद पोलीस करीत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com