Accident News: मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपला अपघात; तीन ठार, मृतात दोन बालकांचा समावेश

मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपला अपघात; तीन ठार, मृतात दोन बालकांचा समावेश
Accident News: मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपला अपघात; तीन ठार, मृतात दोन बालकांचा समावेश
Accident Newssaam tv

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मोदलगाव येथे मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाचा अपघात झाल्याने ३ जण जागीच ठार झाले. तर ९ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकाच्या मदतीने धडगाव (Dhadgaon) जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. नऊ जखमींपैकी एका जणाला डोक्याला जबर मार लागल्याने (Nandurbar Accident) त्याची प्रकृती चिंताजनक आहे. (nandurbar news Accident pickup carrying workers Three killed)

Accident News
कुसुंबा परिसरात लाखोचा सुगंधी पानमसाला, गुटखा जप्‍त

पीकअप वाहनातील सर्व प्रवाशी मजुर गोरंबा येथील रहिवासी असून आपल्या गावाहून मिरची तोड मजुरीसाठी नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील लोय पिपळोद येथे येत असताना घाट रस्त्यात पिकअप वाहन तीव्र उतारावरून मागे येत दरीत कोसळले. ही दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी धडगाव पोलीस (Dhadgaon Police) दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

मृतात महिला व दोन बालकांचा समावेश

स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने जखमी मजुरांना रुग्णवाहिका व खाजगी वाहनांच्या मदतीने धडगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर अपघातात मयत (Accident Death) झालेल्यांपैकी एक महिला व दोन बालकांचा समावेश आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.