Nandurbar News: नर्मदा काठावरून सव्‍वालाखाचे सागवान लाकूड जप्त; धडगाव वन विभागाची कारवाई

नर्मदा काठावरून सव्‍वालाखाचे सागवान लाकूड जप्त; धडगाव वन विभागाची कारवाई
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या मकडकुंड गावात अवैधरित्या लाकूड विक्री होत असल्याची माहिती वन विभागाला (Forest Department) मिळाली होती. त्‍यानुसार वन विभागाने कारवाई केली असता नर्मदा काठावरून सव्‍वालाखाचे सागवान लाकूड जप्त केले आहे. (Breaking Marathi News)

Nandurbar News
Dhule News: पुलावरून उडी मारत तरुणीची आत्महत्या; आत्महत्येचा संपूर्ण थरार बघ्यांनी केला व्हिडिओ

वन विभागाच्‍या पथकाने (Dhadgaon Forest Department) गावात तपासणी केली असता एक लाख 25 हजाराच्या लाकूड मिळून आले असून या लाकडांची कुठेही नोंद नसल्याने वन विभागाने लाकूड (Nandurbar News) जप्‍त केले आहे. यात सागदांडी, साग बेलखे, खैर प्रजातीचे सालिसह व विनासालीसह बेवारस लाकूड साठा जप्त केला आहे. सागाच्या लाकूड 4.80 घनमीटर माल किंमत 96 हजार 407 व खैर एकूण 1.373 घनमीटर 27 हजार 133 रूपयांचा माल जप्त केला आहे. असा एकूण 1 लाख 23 हजार 540 रुपयांचा मुददेमाल ताब्यात घेतला आहे.

वन विभागाने नर्मदा नदी किनारी अतिशय दुर्गम भागात नर्मदा नदीमधून सदर माल बार्जच्‍या साह्याने पौला येथून वाहतूक करून पुन्हा खाजगी वाहनाने वाहतूक करून धडगाव टिंबर डेपोत जमा केला. सदरच्या गुन्हा हा वनरक्षक माकडकुंड यांनी नोंदविला. पुढिल तपास वनपाल माकडकुंड करित आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com