Nandurbar Rain: अतिवृष्टीत नुकसानीच्‍या पाहणीसाठी प्रशासन पोहोचले नर्मदा घाटीत

अतिवृष्टीत नुकसानीच्‍या पाहणीसाठी प्रशासन पोहोचले नर्मदा घाटीत; तात्काळ मदतीचे आश्वासन
Nandurbar Rain Today, Heavy Rain In Nandurbar, Heavy Rain In Nandurbar
Nandurbar Rain Today, Heavy Rain In Nandurbar, Heavy Rain In NandurbarSaam tv

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा अतिदुर्गम अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे घरे, रस्ते व शेतीचे अतोनात नुकसान नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर (Nandurbar) नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्गम भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देत नागरिकांना तत्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. (Nandurbar Rain Today)

Nandurbar Rain Today, Heavy Rain In Nandurbar, Heavy Rain In Nandurbar
Dhule News: कोरोना पुन्हा पाय पसरवतोय; बारा दिवसात दीडशे नवीन पॉझिटिव्ह

जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी (Gujrat) गुजरात मार्गे केवढ्या येथून नर्मदा नदीतून बोटद्वारे अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शेवटचं टोक मनीबेली, चिमलखेडी भूषा, सिंदुरी, गमन नुकसानग्रस्त भागात पाहणीसाठी पोहोचले होते. नर्मदा किनारी बोटद्वारे गेलेल्या दौऱ्यामध्ये (Nandurbar Collector Manisha Khatri) जिल्हाधिकारी मनीषा खत्री, तळोदा (Taloda) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. मेनक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, अक्कलकुवा गटविकास अधिकारी व पंचायत समिती अधिकारी यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक सहभागी होते. पाहणी दौऱ्यादरम्यान चिमलखेड येथील ग्रामस्थ नुरजी वसावे, नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते चेतन साळवे, लतिका राजपूत व चिमलखेडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तात्‍काळ मदतीचे आश्‍वासन

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नवापूर आणि अक्कलकुवा, धडगाव या तीन तालुक्यांमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद असून नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी आश्रम शाळेत देवगंगा नदीचा पूर आल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच पिंपळखुटा, जांगठी, गमन, सिंदुरी चिमलखेडी, मनीबेली या गावांना जाण्यासाठी डोंगरदर्‍याचा रस्ता पुरामुळे वाहून गेल्याने दळणवळणाची सोय ठप्प झाली आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा दुर्गम भागात नुकसानग्रस्त भागांना भेट देण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांनीही आभार मानले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात तात्काळ मदत करून नागरिकांचे जनजीवन सुरळीत केले जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. (Heavy Rain In Nandurbar)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com