नवापूर, नंदुरबार तालुक्यात पावसाचे आगमन; दमदार पावसाची प्रतीक्षाच

नवापूर, नंदुरबार तालुक्यात पावसाचे आगमन; दमदार पावसाची प्रतीक्षाच
नवापूर, नंदुरबार तालुक्यात पावसाचे आगमन; दमदार पावसाची प्रतीक्षाच
RainSaam tv

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील खांडबारा, विसरवाडी व नंदुरबार तालुक्यातील विविध भागात दुपारच्या सुमारास काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे आगमन झाले आहे. खांडबारा परिसरात पहिल्यांदाच विजांच्या कडकडाटासह जोरदार आगमन झाले आहे. परिसरात पाऊस (Rain) आल्याने गारवा निर्माण असून आजच्‍या पावसामुळे शेती कामांना वेग येणार आहे. (nandurbar news Arrival of rains in Navapur and Nandurbar taluka)

खांडबारा येथे आज आठवढी बाजार असल्याने पावसाच्या (Nandurbar News) आगमनाने नागरिक व व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. त्याचबरोबर सातपुड्यातील अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील मोलगी, दाब, वालंबा परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. आतापर्यंत निवडक भागातच हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. जून महिन्याच्या पंधरवाडा उलटला असला तरी जिल्ह्यातील अनेक गावांत अद्यापही पहिला पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना दमदार मान्‍सूनची प्रतीक्षा कायम आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com